रायगडमध्ये 4,156 तर पेणमध्ये 784 दुबार मतदार

पेण ः प्रतिनिधी राज्यातील नगरपालिका व नगरपंचायतीचे निवडणुकीचे बिगुल वाजले असून, रायगड जिल्हयातील 10 नगरपरिषदेंचा यामध्ये समावेश आहे. 10 नगराध्यक्षांसह 217 नगरसेवक निवडून येणार आहेत. पूर्ण जिल्हयात 2,37,503 मतदार असून यामध्ये 4,156 मतदार हे दुबार आहेत. पेण नगरपालिकेचा विचार करता 12 प्रभागांमध्ये 24 नगरसेवक निवडुन येणार असून एकूण मतदार 33,875 आहेत. यामध्ये 784 मतदार हे […]

Continue Reading

निलेश म्हात्रे मित्र मंडळाचे रक्तदान शिबीर संपन्न

पेण ः प्रतिनिधी वडखळ ग्रामपंचायतीचे सदस्य तथा समाजिक कार्यकर्ते निलेश पांडुरंग म्हात्रे यांच्या 50 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून निलेश म्हात्रे मित्रमंडळ व गणपती देवस्थान वडखळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि शासकीय रक्त केंद्र अलिबाग यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीराचे आयोजन वडखळ येथे करण्यात आले होते. या शिबीरामध्ये शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबीरासाठी वडखळ सरपंच शिवानी म्हात्रे, […]

Continue Reading

भाजप पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखाती पार

पेण : प्रतिनिधी पेण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे पेण शहरातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पक्षाने दिलेल्या आदेशानुसार नुकत्याच आमदार रवीशेठ पाटील यांच्या निवासस्थानी घेण्यात आल्या. सदर मुलाखती दरम्यान भाजप दक्षिण जिल्हा अध्यक्ष तथा राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील पेणच्या मा. नगराध्यक्षा प्रितम पाटील ज्येष्ठ भाजप नेते बाळासाहेब जोशी जिल्हा पदाधिकारी श्रीकांत पाटील […]

Continue Reading

पेण पोलीस स्टेशन मार्फत एकता दौडचे आयोजन

पेणःप्रतिनिधी भारताचे पहिले उपपंतप्रधान तथा गृह मंत्री पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दिडशेव्या जयंती निमित्त पुर्ण देशात राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जात असून, त्यानिमित्त पुर्ण देशात गृह खात्यामार्फत एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच भाग म्हणून पेण पोलीस स्टेशनमार्फत एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. हि दौड प्राप्त्त कार्यालय पेण येथून सुरू […]

Continue Reading

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींच्या हस्ते मार्ग पाटीचे अनावरण

गाव जो पर्यंत राहित तो पर्यंत नाव राहिल:- प्रभाकर म्हात्रे हरि ओम पेण : प्रतिनिधी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. जयप्रकाश ठाकूर यांच्या दिव गावातील रस्त्याला कै. जयप्रकाश ठाकूर मार्ग असे नामकरण फलकाचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महाद् मानकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रभाकर म्हात्रे तथा हरिओम यांनी […]

Continue Reading

विकासाची दृष्टी ठेवणारे सरपंच, खासदार धैर्यशील पाटील

कांदळे ग्रामपंचायतीमध्ये विकास कामांचे लोकार्पण पेण : प्रतिनिधी ग्रुप ग्रामपंचायत कांदळेच्या नुतन कार्यालयाचे लोकार्पण आणि जलशुध्दी करण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळी राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील यांनी कांदळे गावचे सरपंच मुरलीधर भोईर यांचे गौरव करताना सांगितले की, तालुक्यात वोटावर मोजणारे जे सरपंच आहेत त्यांना विकासाची दृष्टी आहे. त्यामध्ये मुरलीधर भोईर यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. आपल्या […]

Continue Reading

पेण भाजप युवा मोर्च्याच्या कार्यकारणी पदाची नियुक्ती जाहिर

पेण :- प्रतिनिधी आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकींचा विचार करून भाजप पक्ष बळकट करण्याच्या दृष्टीने युवा मोर्चाचे अध्यक्ष स्वप्निल म्हात्रे आणि विवेक म्हात्रे यांनी पेण तालुक्यातील युवा मोर्चाच्या नविन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या वरिष्ठांच्या आदेशाने नुकत्याच जाहिर केल्या. त्यांना नियुक्तीपत्र जिल्हा अध्यक्ष रायगड तथा खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते त्यांच्या राहत्या स्नेहसागर बंगल्यावर देण्यात आले. यावेळी […]

Continue Reading

पेणमध्ये पुरग्रस्तांना मदत

पेण : प्रतिनिधी श्री गणपती देवस्थान व श्रीकृष्ण जन्माष्टमी व श्रीगणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात आसमानी संकटाने बळीराजाचे नुकसान व बळीराजाला आवश्यक असलेली मदत करणे ही आपली जबाबदारी समजून पेण येथील या दोन मंडळाने अकरा-अकरा हजार अशी वावीस हजाराची मदत महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधीला केली आहे. याविषयी गर्जा रायगडशी बोलताना श्री गणपती देवस्थानचे अध्यक्ष […]

Continue Reading

जेएसडब्ल्यू स्टील कंपनीविरुध्द जनमोर्चा म्हणजे सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल

पेण :- प्रतिनिधी जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या फेज थ्री ची जनसुनावणी २२ ऑगस्ट रोजी पार पडली. यावेळी अनेकांनी जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या प्रदुषणावावत आपापल्या हरकती घेतल्या काहींनी. तर लांबलचक भाषण ठोकली. अधिकारी वर्गाला दिलेल्या हरकतींचा निर्णय ही आलेला नाही तेव्हाच काहीजण स्वतःच्या हितासाठी जनमोर्चाचे आयोजन करत आहेत. १३ ऑक्टोंबरला होणारा जनमोर्चा हा फक्त आणि फक्त स्वतःची पोळी […]

Continue Reading

पेण नगरपरिषद खुला महिला प्रवर्गासाठी राखीव

पेण :- प्रतिनिधी सर्वोच न्यायालयाने जानेवारी महिना संपण्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे निवडणुक प्रक्रियेच्या कामाला वेग आला आहे. प्रशासनाने वेगाने तयारी देखील सुरु केली आहे. आज मंत्रालयात मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष पदाची सोडत काढण्यात आली. त्यामध्ये रायगड जिल्हातील पेण, अलिबाग, उरण नगरपालिका खुला महिला प्रवर्ग तर, कर्जत, मुरुड-जंजिरा […]

Continue Reading