मध्यान्ह भोजन आहारासाठी कालबाहय अन्न पदार्थांचा पुरवठा

State



पेण :-प्रतिनिधी

पेण येथील पोषण आहारातील उंदीर प्रकरण ताजे असतानाच आज पुन्हा एकदा ठेकेदाराकडून कालबाह्य अन्न पदार्थांचा पुरवठा करण्यात आला परंतु मध्यान्ह भोजन आहार तयार करणाऱ्या ठेकेदाराच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला आहे. कर्जत येथील सबठेकेदार सचिन देशमुख यांच्या मार्फत पेण येथे मध्यान्ह भोजन आहाराचा सामान पोहोच करण्यात येतो. मात्र आज आलेल्या सामानामध्ये हळद, मिठ, मिरचीपावडर यांचे पॉकीट मुदत बाहय होते. ठेकेदाराने ही बाब निर्देशनास आणून दिल्यानंतर पुरवठा करणारा ठेकेदाराने बदलून देतो तक्रार करू नका अशी विनंती केली मात्र प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी यामध्ये हस्तक्षेप करून सबठेकेदार सचिन देशमुख याच्याशी भ्रमन्ती ध्वनीवरून संपर्क करून झालेला प्रकार विचारल्या नंतर त्यांनी सागितले की, मी सब ठेकेदार आहे मुळ ठेकेदार हा जळगाव चा असून साई मार्केटींग या नावाने पोषण आहाराचा सामान पुरविला जातो. पुढे त्याने अक्कलेचे तारे तोडत चुकुन पॅकेट पडले असतील ते बदलून देतो असा सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला.

त्या नंतर समाजसेवक हरेश बेकावडे तेथे पोहोचले त्यानी देखील मध्यान्ह भोजन आहारामध्ये वापर असलेल्या पदार्थांवर आपले मत मांडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला

त्या नंतर समाजसेवक हरेश बेकावडे तेथे पोहोचले त्यानी देखील मध्यान्ह भोजन आहारामध्ये वापर असलेल्या पदार्थांवर आपले मत मांडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला