पेणः मुस्कान खान
पेण तालुक्यातील खरोशी केंद्राच्या क्रीडा व व्यक्तिमत्व विकास स्पर्धा केंद्रप्रमुख प्रङ्गुल्ल सुखचंद यांच्या नेतृत्वात प्रयोगशील शेतकरी प्रभाकर पाटील यांच्या वलक येथील शेतावर मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. यावेळी क्रीडा प्रकारांमध्ये मुलांसाठी लगोरी, बेचकीने नेम धरणे, तसेच मुलींसाठी लंगडी आणि दोरी उडी या खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. तर, व्यक्तिमत्व विकास अंतर्गत पारंपारिक गीतावर नृत्य, समूहगीत गायन, पथनाट्य आणि मातीचे शिल्प तयार करणे या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यावेळी, या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष वलक नंदेश म्हात्रे, मा. उपसरपंच बळवली गणेश पाटील, नरेश ठाकूर, यांच्यासह अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला भेट दिली. तर विद्यार्थी व पालक यांच्या दुपारच्या वनभोजनाची सोय प्रभाकर पाटील यांनी केली. स्पर्धेत विविध खेळात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते चषक देऊन सत्कार करण्यात आले.
