पेण:(मुस्कान खान)
पेण पोलीस ठाणेकडे गुन्हा रजि. नं. ३२४/२०२४ भा.न्या.सं. कलम ३२५, ३(५) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे सुधारीत अधिनियम २०१५ चे कलम ५(अ), ५ (क), ९, ९ (अ) तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलीम १९२ (अ) हा गुन्हा दिनांक १५/१२/२०२४ रोजी १७.३० वाजता दाखल आहे.
सदर गुन्हयाच्या तपासाबाबत मा. पोलीस अधीक्षक सोो रायगड व मा. अपर पोलीस अधीक्षक सो रायगड यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे तसेच मा. उप विभागीय पोलीस अधिकारी सो श्री. गजानन टोम्पे व मा. पोलीस निरीक्षक श्री. संदिप बागुल यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे पेण पोलीस स्टेशनकडील पोलीस उपनिरीक्षक श्री. समद बेग तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार या गुन्हयाचा तपास करीत आहेत. सदर गुन्हयातील टेम्पो कमांक एमएच ०५/एफ जे १५११ मध्ये ६,९८,०००/- रूपये किंमतीचे ३४९० किलोग्रॅम वजनाचे गो वंशीय जनावरांचे मांस मिळुन आल्याने ते मा. वरिष्ठांच्या आदेशान्वये नाश करण्यात आले आहे. तसेच ३ लाख रूपये किंमतीचा टेम्पो कमांक एमएच ०५/एफ जे १५११ जप्त करण्यात आला आहे. गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना टेम्पो कमांक एमएच ०५/एफ जे १५११ चे मालक साजीद लायक कुरेशी रा. रसुल बिल्डींग, कुरेशीनगर, कुर्ला पुर्व, मुंबई असे असल्याचे समजले. गुन्हयातील आरोपीत १) अफसर मेहबुब कुरेशी वय ३९ वर्ष, रा.रूम नं. ५. कुरेशीनगर, कब्रस्तान रोड, रज्जब शेठ चाळ, कुर्ला पुर्व, मुंबई, २) नजरूद्दिन निजामुद्दिन खान वय- ४८ वर्ष, रा.रूम नं.११, अब्बास शेठ चाळ, कुरेशी नगर, कब्रस्तान रोड, कुर्ला पुर्व, मुंबई, ३) साजीद लायक कुरेशी वय-४३ वर्ष, रा.रूम नं. १२,१३, बिल्डींग नं. ३९, गुलाम रसुल चाळ, कुरेशीनगर, कुर्ला पुर्व मुंबई यांची माहिती घेउन चौकशी अंती त्यांचा सदर गुन्हयात सहभाग असल्याची खात्री झाल्यावर त्यांना दिनांक १९/१२/२०२४ रोजी अटक करण्यात आली असुन त्यांची दिनांक २६/१२/२०२४ रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली आहे. गुन्हयातील पाहीजे आरोपीत यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
सदर गुन्हयाचे तपासामध्ये मा. पोलीस निरीक्षक श्री. संदिप बागुल यांचे मार्गदर्शनाखाली पेण पोलीस स्टेशनकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोसई श्री. समद बेग व सहा. फौजदार श्री. राजेश पाटील, पोह/१०४१ राजेंद्र भोनकर, पोह/८७३ संतोष जाधव, पोह/८६१ प्रकाश कोकरे, पोह/१५६८ अजिंक्य म्हात्रे, पोह/१४२४ सुशांत भोईर, पोह/८८५ सचिन व्हसकोटी, पोना/२३१९ अमोल म्हात्रे व पोशि/१९५१ गोविंद तलवारे हे काम करीत आहेत.
ReplyForward
|