पेण ः प्रतिनिधी
पेण येथे राज्याचे माहिती, तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची रायगड जिल्हा संपर्क मंत्री म्हणून नेमणूक झाल्यानंतर संघटनात्मक बैठकीसाठी आले होते. या बैठकीला खा.धैर्यशील पाटील, आ. रवीशेठ पाटील, आ.प्रशांत ठाकूर, आ. महेश बादली, सतिश धारप, वैकुंठ पाटील, मिलिंद पाटील हे उपस्थित होते त्यावेळी पेण तालुक्यातील गणेश मुर्तीकारांनी मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी सांगितले की, गणपती कारखानदारांच्यासोबत सरकार आहे. पी.ओ.पी. वर बंदी ही न्यायालयाने टाकली असली तरी, शासन याबाबत कायदेशीर लढाई लढून पी.ओ.पी.वरील बंदी उठविण्यासाठी सर्वोत्वपरी प्रयत्न करणार. मला गणपती कारखानदारांचे दुःख माहित आहेत. मी देखील एका गणपती भक्त आहे. आमचे सरकार पूर्णपणे गणपती कारखानदारांसोबत असून, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब गणपती कारखानदारांच्या याविषयावर तांत्रिक बाबी पाहत आहेत त्यामुळे नक्कीच गणपती कारखानदारांना बाप्पाच्या आर्शीवादाने त्यांच्या इच्छेनुसारच पी.ओ.पी.वरील बंदी उठल्याची बातमी मिळेलच असे गणपती मुर्तीकार कारखानदारांना अश्र्वस्त केले.
