पेण ः प्रतिनिधी
रायगड जिल्हातील नगरपालिका कर्मचार्यांच्या क्रिडा महोत्सवाचा शुभारंभ जिल्हा नगरपरिषद प्रशासन नगरविकास शाखाचे अधिकारी शाम पोशेट्टी यांच्या हस्ते पेण नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर मोठया जल्लोषात शुभारंभ झाला.
रायगड जिल्हयातील एकुण 16 नगरपरिषद व नगरपंचायतीच्या वार्षिक क्रिडा महोत्सव 20 डिसेंबर ते 22 डिसेंबरच्या दरम्यान पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर होणार असून यामध्ये आउट डोअर आणि इनडोअर खेळांचा समावेश आहे. या स्पर्धेत 300 ते 350 नगरपालिका कर्मचारी खेळांडूनी सहभाग घेतला आहे. पेण नगरपालिकेच्या यजमान पदाखाली ही स्पर्धा होत असून पेण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी या स्पर्धेची जय्यत तयारी केली असून बाहेरून येणार्या नगरपरिषदेच्या खेळाडूंचे ढोल ताशाच्या गजरात व पुष्पवृष्टी करुन स्वागत केले जात होते. क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन बाप्पाच्या मुर्तीचे पुजन करुन तसेच दिपप्रज्वलन करुन शाम पोशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोहा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय ऐडके, खोपोलीचे पंकज पाटील, कर्जत वैभव गरवे, महाडचे धनंजय कोलेकर, उरणचे समीर जाधव, अलिबागचे सचिन बच्च्याव, खालापूरच्या रश्मी चव्हाण, म्हसळा विठ्ठल राठोड, सुधागड पाली विदया ऐरणकर, तळा मनिषा वंजाळे, श्रीवर्धन विराज लंबडे, माथेरान राहूल इंगळे, माणगाव संतोष माळी हे सर्व मुख्याधिकारी हजर होते तसेच पेणचे उदयोजक राजू पिचिका हे ही उपस्थित होते. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत पेण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देउन स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते उरण विरुध्द खोपोली या संघांच्या क्रिकेट मॅच ची नाणेफेक करुन सुरुवात करण्यात आली.
या स्पर्धेचे बक्षिस वितरण पेण चे आमदार रविशेठ पाटील आणि जिल्हा न.पा.प्रशासन अधिकारी शाम पोशेट्टी, पेण नगरपालिका मुख्याधिकारी जिवन पाटील, उद्योजक राजू पिचिका, मा.सभापती डी.बी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कबड्डी प्रथम क्रमांक उरण, द्वितीय क्रमांक खोपोली, हॉलीबॉल प्रथम क्रमांक डी.एम.ए संचालन कार्यालय, द्वितीय क्रमांक महाड, समुह गायन प्रथम क्रमांक शुभांगी वाशीकर, गणेश रामधरणे पेण, द्वितीय क्रमांक संतोष माळी, छाया अहिर माणगाव, रिले प्रथम क्रमांक पेण नगरपालिका, क्रिकेट प्रथम क्रमांक अलिबाग नगर पालिका, द्वितीय क्रमांक मुरूड. बुध्दिबळ पुरूष प्रथम क्रमांक प्रसाद पाटील पोलादपूर, द्वितीय क्रमांक विनायक तडे महाड, बुध्दिबळ महिला प्रथम क्रमांक अश्र्विनी साळवी पेण, द्वितीय क्रमांक रूपाली देवकर अलिबाग, कॅरम प्रथम क्रमांक पुरूष सुनिल पारखे माणगाव, द्वितीय क्रमांक हेमंत पाटील अलिबाग, कॅरम महिला प्रथम क्रमांक रूपाली देवकर अलिबाग, द्वितीय क्रमांक दर्शना ठाकूर पेण, बॅटमिनटन पुरूष प्रथम क्रमांक निखिल म्हात्रे पेण, द्वितीय क्रमांक अजय जोरी कर्जत, बॅटमिनटन महिला प्रथम क्रमांक संगिता ठाकूर खोपोली, द्वितीय क्रमांक सुविध्या पाटील पेण, नृत्य सोनाली शिर्के पेण, द्वितीय अंकिता हरपाल पेण, समुहनृत्य ग्रुप विशाल गायकवाड ग्रुप उरण, द्वितीय निकिता पाटील ग्रुप पेण, तृतीय सुविधा पाटील ग्रुप पेण, रांगोळी प्रसाद पाटील पेण, मिलींद पायगुडे रोहा अशा प्रकारे सांगीत व वैयक्तिक पारितोषिक पटकाविले. तीन दिवस सुरू असलेल्या या महोत्सवांची सांगता खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
