पक्षापासुन बाजुला गेलेत त्यांना पक्षाचे दरवाजे बंद, आमदार प्रशांत ठाकूर

Political

पेणःप्रतिनिधी

आज या ठिकाणी पक्षाच्या बरोबरीने जे राहिलेत जे पक्षाच्या बरोबरीने राहुन पक्षाच्या योजना ज्यांच्या मार्फत लोकांपर्यंत नेल्या त्यांना हे आम्ही केल अस वाटत त्यांना सुध्दा त्यांची जागा दाखवुन देणे ही कार्यकर्ता म्हणून आपले सर्वांचे कर्तव्य आहेत. त्यामध्ये आपण कुठेही कमी पडता कामा नये. घरोघरी जाउन लोकांची दिशाभुल केली जाते, घरोघरी जाउन लोकांच्या मनामध्ये संभ्रम पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. आज जे पक्षापासुन बाजुला गेलेत त्यांना पक्षाचे दरवाचे बंद झाले हा संदेश सुध्दा आपल्याला लोकांपर्यत पोहोचवायचा आहे. त्याच्यासाठी आपण सर्वजण सज्ज होउ या. असे रोखठोक मत वडखळ गटाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार प्रभाकर उर्फ हरीओम म्हात्रे, वडखळ गणाचे उमेदवार प्रदिप म्हात्रे, वाशी गणाचे उमेदवार विवेक म्हात्रे यांच्या प्रचाराच्या वेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजप पक्ष सोडून एका दिवसात शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश केलेल्या मिलिंद पाटील यांचे नाव न घेता आपले मत मांडले.

भाजप उपजिल्हाध्यक्ष मिलिंद पाटील यांनी भाजप पक्षा बरोबर असताना आमदार प्रशांत ठाकूर यांचे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. मात्र भाजपला सोडून शिवसेनेत प्रवेश करून जिल्हा परिषदेची उमेदवारी करत असल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की, जे पक्ष सोडून गेलेत त्यांचा पक्षाशी काडीमात्र संबंध राहिलेला नाही. त्यांनी संभ्रम निर्माण करू नये असे ही बजावले आहे. या दोघांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज आपण सर्व मंडळी येथे उपस्थित झालेलो आहोत. खर तर या प्रचाराचा शुभारंभ करत असताना येणाऱ्या ५ फेब्रुवारीला होणारा मतदान या मतदानाच्या माध्यमातून आपल्याला सर्वांनाच या निवडणूकीच्या माध्यमातून येणाऱ्या पाच वर्षासाठी रायगड जिल्हा परिषद आणि पेण पंचायत समिती याच्या माध्यमातून या मतदार संघाचा विकास कसा घडणार याच्यासाठी आपण सर्वांनीच कष्ट करायचे आहेत. विविध पध्दतीने या निवडणूकीची सर्वसामान्य जनता वाट पाहत असते. आणि तुमच्या कालावधीमध्ये आपल्या मतदार संघाचे प्रश्न या जिल्हा परिषदेमध्ये मांडले जातील, पंचायत समितीमध्ये मांडले जातील आणि त्यामुळे या निवडणूकीमध्ये होणारे मतदान हे जास्तीत जास्त आपल्याला कस घेता येईल यासाठी घरोघर जाउन प्रचार करायची आवश्यकता आहे. आपण गावदेवी मातेचे आर्शिवाद घेतलेले आहेत. मंदिराच्या आपण क्षेत्रात आहोत त्यामुळे राजकीय भाषण हे आपल्याला करता येत नाही पण मी आपले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती करेन की, प्रचाराच्या दृष्टिकोनातून एक आणि एक घर पिंजुन काढत प्रत्येक घरोघरी जाउन आपली निशाणी ही आपल्याला पोहोचवायची आहे. आणि या भागाची सेवा करण्यासाठी आणि प्रश्न सोडवण्यासाठी ज्या पध्दतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी काम करतात, ज्या पध्दतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काम करतात त्यांच्या कामाचा वारसा हा आपण पुढे घेउन चाललेलो आहोत आणि त्यामुळे या परिसराच्या अडचणी सोडवण्याची क्षमता केवळ आपल्या मध्येच आहे. हे मतदारांना जाउन आपल्याला सांगायचे आहे. हयासाठी आपण सर्व मिळून सज्ज होउ या. आणि आपल्या हया दोन्ही उमेदवारांना आपल्याला विजयी करायचे आहे आपल्याला या पेण तालुक्यामध्ये या मतदार संघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या बरोबरीने राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि त्यामुळे एक मोठी ताकद या संपुर्ण मतदार संघामध्ये कार्यकर्ते लोकांच्या पाठीमागे उभी करू शकतात. लोकांच्या अडी अडचणी, समस्या या आपण सर्व मंडळी सोडवू शकतात.
वडखळ इंद्रनगर येथील प्रचाराच्या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे उमेदवार प्रभाकर म्हात्रे उर्फ हरीओम, वडखळ गणाचे उमेदवार प्रदिप म्हात्रे, वाशी गणाचे उमेदवार विवेक म्हात्रे यांच्या बरोबर मा. जिल्हा परिषद सभापती सुरेश म्हात्रे, वडखळचे मा. सरपंच तथा भाजप युवा नेते योगेश पाटील, वडखळ सरपंच शिवानी म्हात्रे, कृषीउत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रफुल्ल म्हात्रे, डोलवी सरपंच परशुराम म्हात्रे, उंबर्डे सरपंच महेश पाटील, यांच्यासह वडखळ ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने हजर होते.