मोठया जल्लोषात भाजपच्या वडखळ गटाच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ

Political

पेणःप्रतिनिधी
भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, , आर.पी.आय महायुतीचे वडखळ गटाचे उमेदवार प्रभाकर म्हात्रे, वाशी गणाचे उमेदवार विवेक म्हात्रे, वडखळ गणाचे उमेदवार प्रदिप म्हात्रे यांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठया जल्लोषात वाशी येथील माता जगदंबेच्या मंदिरात श्रीङ्गळ वाढवून करण्यात आला.
सर्व प्रथम उमेदवार व त्यांच्या बरोबर आलेल्या सर्व मान्यवर नेत्यांचे औक्षण सुहासनिंच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मंदिरात जाउन खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील, यांच्याहस्ते प्रचाराचा नारळ वाढविण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा प्रतिम पाटील, दयानंद भगत, विकास म्हात्रे, नरेंद्र ठाकूर, मधुकर कांबळे, यांच्यासह मोठया संख्येने भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, आर.पी.आय महायुतीचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला खासदार धैर्यशील पाटील, नगरपालिका गटनेते अनिरूध्द पाटील, विकास म्हात्रे दयानंद भगत यांच्याहस्ते पुष्पमाळा घालण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत खारेपाट ग्रामस्थांनकडून करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक प्रङ्गुल्ल म्हात्रे यांनी केले. त्यानंतर शिर्की चे युवा कार्यकर्ते गणेश पाटील, विकास म्हात्रे, नगराध्यक्षा प्रितम पाटील, आर.पी.आयचे मधुकर कांबळे, खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विजयाची खात्री देत केंद्रापासुन जिल्हा परिषदेपर्यंत सरकार हा भाजपचाच असेल असा आत्मविश्र्वास प्रकट केला. यावेळी मोठया संख्येने महिला वर्ग उपस्थित होत्या. तसेच खारेपाटातील शेकडो कार्यकर्ते देखील उपस्थित होते. शेवटी छोटयाखानी सभेचा आभार जिल्हा परिषदेचे उमेदवार प्रभाकर म्हात्रे यांनी मानले. यावेळी व्यासपिठावर खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील, मा.जिल्हा परिषद सभापती सुरेश म्हात्रे, विकास म्हात्रे, दयानंद भगत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती परशुराम पाटील,भाजपचे मा. तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, उपसभापती नितिन पाटील, राष्ट्रवादीच्या चैत्राली पाटील, वडखळ सरपंच शिवानी म्हात्रे, राष्ट्रवादीचे गंगाधर पाटील, मसद सरपंच हरिश्र्चंद्र पाटील, पंचायत समितीचे उमेदवार विवेक म्हात्रे, प्रदिप म्हात्रे यांच्यासह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.