जेएसडब्ल्यू कंपनीचा 10 लाखांचा स्टील बार जप्त, आरोपीस अटक
पेणःप्रतिनिधी
15 दिवसा पूर्वी सा.गर्जा रायगड मध्ये भंगार धंदयाला खादीवाल्यांचा आर्शिवाद या मथल्याखाली वृत्त प्रसिध्द केले त्या नंतर पोलीस खात्याला जाग आली आणि भंगार व्यवसायिकावर छापा टाकण्यात आला. हे असे झाले आम्ही मारण्यासारखे करतो तुम्ही रडण्यासारखे करा. या विषयी सविस्तर वृत्त असे की, मुंबई-गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातील जिते गावाजवळ असणार्या आकाशदीप हॉटेलच्या पाठीमागे परप्रांतीयांनी अनधिकृतपणे भंगारचा अड्डा उभारला असून, या ठिकाणी कंपन्यांचा येणार माल चोरीद्वारे घेतला जात असल्याची माहिती दादर सागरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांना मिळताच त्यांनी त्या ठिकाणी धाड टाकून जेएसडब्ल्यू कंपनीचा 10 लाखांचा स्टील बार जप्त केला असून आरोपीस अटक केली आहे.
रायगड जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनधिकृतपणे भंगारवाल्यांचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. जेएसडब्ल्यू कंपनी डोलवी येथून टीएमटी स्टील बार माल विविध कंपन्यांना सप्लाय करण्यासाठी ज्योती ट्रान्सपोर्ट मधील ट्रेलर एमएच 46 बीएम 6589 वरील चालक व इतर काही ट्रेलरमधून जात होता. चालकांनी सदरचा पूर्ण माल विविध कंपन्यांना न पुरविता अंदाजे 15 ते 20 टन मालाचा अपहार करून तो जिते येथील आकाशदीप हॉटेलच्या पाठीमागे मोकळ्या जागी अनधिकृतपणे उभारलेल्या भंगारवाल्यांकडे उतरविले असल्याची माहिती फिर्यादी कंपनीचे जनरल मॅनेजर पंकज कुमार अग्रवाल यांनी दादर सागरी पोलीस स्टेशनला दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे धाड टाकून माल जप्त केला.