पेणः मुस्कान खान
पेण एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीअम स्कूलचा विदयार्थी सुज्ञेश सुनिल फुणगे याने वयाच्या सातव्या वर्षी महाराष्ट्रातील 1646 मीटर उंची असणारा कळसुबाई हा सर्वाधिक उंच शिखर सर करुन आपल्या आई वडीलांसोबत पेण एज्युकशेन सोसायटीचे नाव मोठे केले असून सर्व स्तरातून त्याचे कौतूक केले जात आहे. पेण एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीअम स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला.
या कार्यक्रमाला संस्थेचे माजी अध्यक्ष ऍड.बापूसाहेब नेने, शुभांगी नेने आणि संस्थेचे अध्यक्ष ऍड. मंगेश नेने यांच्यासह संस्थेचे उपाध्यक्ष तथा खजिनदार संजय कडू, सचिव सुधीर जोशी, इंग्लिश मिडीअम स्कूल चे अध्यक्ष प्रशांत ओक, घनश्याम देव, वसंत आठवले, दिगंबर चिंचणीकर, अमित देव, निता कदम, प्राचार्या रोहिणी म्हात्रे, शिक्षक प्रतिनिधी भारती महाडीक, विद्यार्थी प्रतिनिधी ओमकार मोकल, माही वडके आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रम प्रसंगी इयत्ता दुसरी मध्ये शिकणारा सुज्ञेश सुनिल फुणगे या सात वर्षीय विद्यार्थ्यांने महाराष्ट्रातील 1646 मीटर उंची असणारा कळसूबाई हा सर्वाधिक उंच शिखर चढून विक्रम केल्याबद्दल विशेष कौतुक करण्यात आले. एखाद्या तरूणाला हा शिखर चढायला साधारणतःचार ते पाच तास लागतात परंतु सुज्ञेशने हे शिखर अवघ्या दोन तास पन्नास मिनिटात चढुन विक्रम केल्याने त्याचे हे पालकांसमवेत विशेष कौतुक करण्यात आले. यावेळी शैक्षणिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, क्रिडा, कला यांसारख्या स्पर्धांमध्ये विशेष यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य रोहिनी म्हात्रे यांनी केले.
