पेणःमुस्कान खान
पेण तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा वरवणे येथील चौथीमध्ये शिकणार्या विद्यार्थिनीचा शाळेच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेला दहा दिवस झाल्यानंतरदेखील आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई शासकीय आश्रमशाळा तसेच आरोग्य विभागावर करण्यात आलेली नाही. दरम्यान, प्रकल्प अधिकार्यांची भूमिका खुशबू ठाकरे हिच्या मृत्यूप्रकरणी संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे. त्यात माध्यम प्रतिनिधी यांच्यासमोर तोंडावर आपल्या हातातील फाईल लावून चेहरा लपविण्याचा प्रयत्न प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांनी केला आहे.
पेण तालुक्यातील तांबडी गावातील आदिवासी नऊ वर्षाची मुलगी तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेत शिकत होती. तेथील आश्रमशाळेत 16 डिसेंबर रोजी झालेल्या कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमात आरोग्य विभागाच्या हिवताव कुष्ठरोग निर्मूलन पथक यांनी चौथीमध्ये शिकणारी खुशबूला कुष्ठरोगी ठरवले होते. त्यानंतर कुष्ठरोगावरील गोळ्या घेतल्यावर खुशबूच्या अंगावर फोडी आल्या आणि नंतर ताप तसेच अंग सुजू लागल्याने पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करावे लागले होते. तेथे उपचार सुरु करण्याआधी कुष्ठरोग निर्मूलन करण्याच्या गोळ्या बंद करण्यात आल्या. त्यानंतर उपचार घेत असताना खुशबू ठाकरे हिचा 22 जानेवारी रोजी मृत्यू झाला होता.
खुशबूला त्यापूर्वी कोणताही आजार नव्हता आणि तसे खुशबूला कुष्ठरोगी ठरवून कुष्ठरोग नसताना तिला गोळ्या देण्यात आल्या आणि परिणाम तिच्या त्याचा अंगावर फोड्या तसेच अंग सुजू लागल्याने चुकीचे निदान केल्याने तिचा बळी गेला आहे. त्यानंतर आदिवासी विभागाच्या अंतर्गत चालणार्या आश्रमशाळा यांच्या हलगर्जीपणाबद्दल प्रकल्प अधिकारी कार्यालयाने आश्रमशाळा प्रशासनाला केवळ करणे दाखवा नोटीस बजावली. कोणतीही कारणे दाखवा नोटीसची मुदत ही तीन दिवसांची असते. त्या नोटिसीला आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षिका यांनी अ्द्याप खुलासा दिलेला नाही. तीन दिवसांत कारणे दाखवा नोटीसीला उत्तर देण्यात आले नाही याची पूर्वकल्पना प्रकल्प अधिकारी कार्यालयात असतानादेखील पुढील कारवाई प्रस्तावित केलेली नाही.तसेच त्या मुलीला कुष्ठरोगी घोषित करणार्या आरोग्य विभागाकडून कोणतीही आदिवासी विकास विभागाकडे नाही. त्याचवेळी प्रकल्प अधिकारीआत्मराम धाबे हे केवळ शासकीय आश्रमशाळेच्या मुख्याध्यापक आणि अधीक्षिका यांना कारणे दाखवा नोटीस देण्याच्या पुढे गेलेले नाहीत. दहा दिवसांत प्रकल्प अधिकारी यांच्याकडून आरोग्य विभाग आणि शासकीय आश्रमशाळा यांच्याकडून झालेल्या प्रकाराबाबद्दल आपल्या वरिष्ठ कार्यालयाला अहवालदेखील सादर करू शकले नाहीत. त्यामुळे खुशबू ठाकरे मृत्यूप्रकरणी आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी यांच्याकडून संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे काम झालेले नाही. दरम्यान, हे सर्व सर्व प्र प्रकरण घडून दहा दिवसांचा कालावधी लोटल्यानंतरदेखील आदिवासी विकास विभाग यांच्याकडून दोषींवर कारवाई करण्याचा प्रयत्न झालेला नाही. त्यामुळे खुशबू ठाकरे मृत्यूप्रकरणी आदिवासी विकास विभाग आणि आरोग्य विभागावर कारवाई व्हावी, अशी मागणी खुशबूच्या आईने केली आहे.
आमच्या मुलीला कोणताही आजार झालेला नव्हता तिच्या चेहर्यावर असलेले डाग हे जन्मापासूनच होते. कुष्ठरोगाचे नव्हते. चुकीचे निदान करून आमच्या मुलीला कुष्ठरोगी ठरविण्यात आले आहे. आमच्या मुलीच्या लिव्हर मध्ये आलेली सूज तसेच अंगावरती सूज हे लक्षण चुकीचे उपचारा मुळे आली होती. माझ्या मुलीच्या मृत्यूस आश्रमशाळा मुख्याध्यपक आणि अधीक्षिका जबाबदार आहेत त्यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करावी. – नामदेव ठाकरे (दुर्दैवी मुलीचे वडील)
आमच्या शाळेत कुष्ठरोग निर्मलन बाबत शिबीर झाले आणि त्यात एका मुलाला कुष्ठरोगी ठरवले होते. प्राथमिक आरोग्य केंद्राकडून देण्यात आलेल्या गोळ्या आमच्या अधीक्षिका यांच्याकडून दररोज तीला देण्यात येत होत्या. तसेच त्या मुलीला ताप आल्यावर आम्ही वाकरूळ येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य उप केंद्रात नेले होते. -अजित पवार, (मुख्याध्यापक, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा वरवणे)
प्राथमिक आरोग्य केंद्राने खुशबू हिला गोळ्या देण्यास सांगितले त्याप्रमाणे मी दररोज दोन गोळ्या झोपण्याआधी देत होते.नंतर तिला ताप आल्यानंतर दोन गोळ्या देण्यास प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी सांगितल्यावर एक गोळी देण्यास सुरुवात केली. तिचे पालक शाळेत आले आणि घरी घेऊन गेले त्यावेळी त्यांना दररोज हि गोळी एक द्यायची आहे असे सांगितले. – सुवर्णा वरगने, अधीक्षक शासकीय आश्रमशाळा वरवणे
शासकीय आश्रमशाळा वरवणे येथील मुलीला कुष्ठरोग झाला असून तिला पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केल्यावर मी स्वतः रुग्णालयात गेलो होतो. जानेवारी रोजी तिचा मृत्यू झाल्यावर शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षिका यांना करणे दाखवा नोटीस बजावली आहे. -आत्माराम धाबे (प्रकल्प अधिकारी – पेण आदिवासी प्रकल्प)
शासनाच्या निर्देश नुसार आम्ही आश्रम शाळेत कॅम्प आयोजित केला होता. तेथे एक विद्यार्थिनीला कुष्ठरोग असल्याचे आढळून आले. त्या दिवशी आमच्याकडे गोळ्यांची पाकिटे नव्हती आणि त्यामुळे लगेच गोळ्या सुरू केल्या नाहीत. दुसर्या दिवशी सदर मुलीचे नावाचे लेबल केल्यावर डिसेंबर पासून उपचार सुरू केले. डॉ. नेत्रा पाटील (वैद्यकीय अधिकारी, कामार्ली प्राथमिक आरोग्य केंद्र)