पेणः प्रतिनिधी
दरवर्षी महाशिवरात्रीला शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी असते. पेण पाटणेश्वर येथील श्री क्षेत्र पाटणेश्वर मंदिरातही आज महाशिवरात्री साजरा करण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
आज महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीचा दिवस भाविकांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस असतो. माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. दरवर्षी महाशिवरात्रीला शिवमंदिरामध्ये दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी असते. पेण पाटणेश्वर येथील श्री क्षेत्र पाटणेश्वर मंदिरातही आज महाशिवरात्री साजरा करण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. मध्यरात्री १२ वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनासाठी श्री क्षेत्र पाटणेश्वर मंदिरात मोठी गर्दी केली होती.
महाशिवरात्रीचा एक पवित्र सण जो देशभरात अतिशय भक्तिभावाने सर्वत्र साजरा करण्यात येतो. दर्शनासाठी रायगडच्या वेगवेगळ्या भागांमधून भाविकांनी श्री क्षेत्र पाटणेश्वर मंदिरात दर्शन करण्यासाठी मध्यरात्रीपासूनच मोठी गर्दी केली होती. सालाबादप्रमाणे दुपारी १२ च्या सुमारास पाटणोली गावातून भोले बाबाची पालखी काढण्यात आली. ताल मृदुंगाच्या गजरात २ च्या सुमारास पालखी मंदिरात आणण्यात आली. या पालखी सोहळ्यासाठी पाटणोली गावातील तरूण वर्ग जरी कामानिमित्त बाहेर असले तरी ते पालखीसाठी आवर्जून हजर राहतात. आणि पालखीचा आनंद द्विगुणीत करतात. यावर्षी मोठ्या उत्साहात तरूण वर्गांनी हरिपाठाच्या तालावर ताल धरत, नाचत फुगड्या खेळत पालखी सोहळ्यात रंग भरला. तर या यात्रेमध्ये खाद्य पदार्थांसह खेळणी, शोभेच्या वस्तु, सौदर्य प्रसादनाच्या वस्तुंची मोठ्या प्रमाणात दुकान होती. तर लहान मुलांसाठी पालण्यांसह करमणुकीचे अनेक दुकान लागलेली पहायला मिळाली. दुपारच्या सत्रात सत्रात उन्हाची पर्वा न करता भाविकांनी गर्दीचा उच्चांक गाठला. मात्र या गर्दीची गैरसोय होउ नये म्हणून पुजारी, पाटील कुटुंबास पाटणेश्वर ग्रामस्थांनी अपार मेहनत घेतली.

