पेण:प्रतिनिधी
गेली 15 दिवस भोगावती नदीमध्ये झालेल्या उत्खननाबाबत प्रसार माध्यमांनी बातम्या प्रसिध्द करून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. परंतु गेंडयाच्या कातडीच्या प्रशासनाला काहीच ङ्गरक पडला नाही. अखेर निसर्ग प्रेमी प्राध्यापक उदय मानकवळे यांनी एक दिवसाचा लाक्षणिक धरणे आंदोलन भोगावती नदीच्या पात्रात केला. आठ दिवसापूर्वी या बाबत प्राध्यापक मानकवळे यांनी तहसिल कार्यालयात निवेदनाद्वारे भोगावती नदीमध्ये चाललेले अनधिकृत कामाबद्दल आपले म्हणने मांडले होते. परंतु या बाबत तहसिल कार्यालयातून कोणतीच दख्खल घेतली नाही. प्राध्यापक उदय मानकवळे यांनी नदी वाचविण्यासाठी माङ्गक मागण्या केल्या होत्या म्हणजे भोगावती नदीचे सीमांकन करून पूररेषा निश्र्चित करा. महाराष्ट्रातील सर्व नदयांचे सीमांकन करून उगम स्थान ते संगम स्थानापर्यत पूररेषा दर्शक माहिती ङ्गलक लावा. नदयांवरील पूररेषेच्या आतील अतिक्रमण त्वरीत काढावीत. गटाराचे पाणी, रासायनिक द्रव्य इतर मानवनिर्मित कचरा, प्लास्टिक नदयांमध्ये टाकण्यास बंदी आणावी. महाराष्ट्रातील सर्व नदयांना झेड सिक्युरिटी दया. नदी काटावरील जैवविविधतेचे संरक्षण करा अदींसह भोगावती नदीमध्ये चाललेले अतिक्रमण तातडीने थांबवा. परंतु या बाबत ना महसुल खात्याला घेणे देणे ना जलसंपदा खात्याला घेणे देणे.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना उदय मानकावळे यांनी सांगितले की, हे धरणे आंदोलन प्रशासनाला चेतावणी आहे. भोगावती नदी संदर्भात ठोस पावले जर प्रशासनाने उचली नाही तर येत्या काळात अमरण उपोषण केले जाईल. आज पेण ची जिवनवाहिनी ही भोगावती नदी आहे. परंतु आज अतिक्रमण आणि प्रदूषणाने पुर्ता तीला वेढली आहे. ही कुठे तरी थांबणे गरजेचे आहे.
सीडकोच्या कार्यकारी अभियंत्यांना लेखी कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे ः-आकाश ठोंबरे, उपअभियंता जलसंपदा विभाग
जलसंपदा विभागाचे उपअभियंता आकाश ठोंबरे यांच्या भ्रमन्तीध्वनी क्र. 9028179407 यावर संपर्क साधून प्रा.उदय मानकवळे यांच्या लाक्षणिक धरणे आंदोलना बाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, सिडकोच्या अतिक्रमणा बाबत उदय मानकवळे यांचे पत्र आम्हाला आले होते त्यानुसार आम्ही सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे. तसेच सिडकोने नदीमध्ये अतिक्रमण केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. सिडको विरूध्द आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोतच. तसेच अतिक्रमणाबाबत आम्ही ब्ल्यू लाईन व रेड लाईन निश्र्चितीकरण केले आहे ते मंजूरीसाठी आम्ही वरिष्ठांकडे पाठवले आहे. परवानगी मिळताच पोलीस यंत्रणेच्या मदतीने आम्ही नदीतील अतिक्रमण हटवणार.