पेणः मुस्कान खान
कास्प युनिट पेण तर्ङ्गे सालाबादप्रमाणे या वर्षीही 10 वी च्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन शिबिर पेण येथील रामेश्र्वर हॉलमध्ये घेण्यात आले. त्यावेळी या नवनिर्वाचित कास्प पेण युनिट चेअरपर्सन ऍड.डॉ.निता कदम यांनी शिबिरास भेट दिली. त्यावेळी मुलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, 10 वी नंतर विद्यार्थ्यांच्या व्यक्तीगत विकासासाठी कास्प संस्था सर्वतोपरी मदत करेल. खर्या अर्थाने 10 वी नंतरच विद्यार्थ्यांना नव्या जगाची ओळख होत असते आणि त्यांना अनेक समस्यांना तोंड दयावे लागत असते त्यासाठी प्रत्येकाला व्यक्तीगत विकासाची गरज भासते. म्हणूनच सर्व प्रतिपालीत विद्यार्थ्यांचा वैयक्तिक विकासासाठी आम्ही प्रयत्न करणार. या शिबिरामध्ये सायन्स विषयाचे मार्गदर्शन सौ.ज्योती पाटील-मुंबईकर, गणित विषयाचे मार्गदर्शन संतोष पाटील, इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन पाठक सर यांनी केले. या शिबिरासाठी पेण, कांदळे, कांदळेपाडा, शिर्की, आमटेम, आपटा, डोणवत ङ्गाटा, नारंगी येथील 70 विद्यार्थी हजर होते. हा शिबिर यशस्वी होण्यासाठी कास्प प्रकल्प व्यवस्थापिका निवेदिता ठाकोर, किरण कदम सोशलवर्कर, यांनी विशेष मेहनत घेतली.
