लाडकी बहिण तुपाशी मात्र विदयार्थी राहणार उपाशी

State

पेण ः प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहीर करुन भरभरून लाडक्या बहिणींची मत घेतली. मात्र लाडक्या बहिणींना पैसे देत असताना मध्यान्ह भोजन योजनेचे पैसे गायब झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सप्टेंबर महिन्यापासून मध्यान्ह भोजन आहारासाठी योणारी निधी आलेली नाही. त्यामुळे गेली 5 महिने मध्यान्ह भोजन आहार देणार्‍या बचत गटांची मोठी तारांबळ उडालेली आहे. गेली 5 महिने ना वेळेवर लागणारे धान्य येत आहे ना निधी येत आहे. त्यामुळे बचत गटांनी उसणवार करुन आजपर्यंत मध्यान्ह भोजन आहार पुरविला आहे. परंतू, आत्ता त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेले असल्याने येत्या आठ दिवसात शासनाकडून बिल दिली नाहीत तर पूर्ण पेण तालुक्यातील मध्यान्ह भोजन आहार बंद केला जाणार असल्याची माहिती बचत गटांच्या संघटनेकडून सांगण्यात आले आहे.
मागच्याच महिन्यात महाराष्ट्र शासनाने क्त शो शायनिंग करुन मध्यान्ह भोजन आहार पुरवणार्‍या बचत गटांची झाडाझडती घेउन त्रास देण्याचे काम केले. मात्र त्यांना निधी उपलब्ध नाही याविषयी चर्चा करणे देखील या कमिटीने टाळले. जेव्हापासून लाडकी बहिण योजनेला शासनाने पैसेफीरवले आहेत. तेव्हापासून मध्यान्ह भोजन आहार योजनेसाठी एकही रुपाया शासनाकडून वर्ग करण्यात आलेला नाही. त्यामुळे येत्या आठवडयाभरात पेण तालुक्यातील मध्यान्ह भोजन योजना बचत गटाने बंद केल्यास हजारो विदयार्थ्यांवर उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही याला जबाबदार कोण असेल? हा मोठा एक गहण प्रश्र्न आहे लाडक्या बहिणींच्या प्रेमात शासन चिमुकल्या विदयार्थ्यांना विसरले हेच खरं
शासनाकडून निधी उपलब्ध नाही. ः श्रीकांत मोरे, लेखा अधिकारी जि.प.रायगड
सप्टेंबर पासून मध्यान्ह भोजन आहाराची देयक न मिळाल्याबाबत भ्रमंती ध्वनीवरुन श्रीकांत मोरे लेखा अधिकारी यांना विचारणा केली असता राज्यशासनाकडून निधी उपलब्ध झालेली नाही त्यामुळे मध्यान्ह भोजन आहार योजनेची बिल देता आली नाहीत. मात्र आम्ही मागणी केली आहे लवकरात लवकर निधी उपलब्ध होईल.