पेण तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

State

पेणः वार्ताहार
पेण प्रांत कार्यालयाचे ध्वजारोहण प्रांताधिकारी प्रविण पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी स्थानिक आमदार रविशेठ पाटील, तहसिलदार तानाजी शेजाळ उपस्थित होते. तर पेण नगरपालिकेचे ध्वजारोहण मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्या हस्ते झाले. नगरपालिकेच्या ध्वजारोहणासाठी माजी नगराध्यक्षा, नगरसेवक मोठया संख्येने उपस्थित होते. तर प्रांत कार्यालयातील ध्वजारोहणासाठी पेण तालुक्यातील राजकीय पक्ष्यांचे पुढारी कार्यकर्ते तसेच शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते पेण एज्युकेशन सोसायटीच्या सौ.म.ना.नेने कन्याविद्यालयाच्या पटांगणावर शालेय व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी परेड, देशभक्तीपर गीतांचे गायन, नृत्य, लेझीम, अदी कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर करुन जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. तर ध्वजारोहण, पी. एम.भांडवलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
महात्मा गांधी स्मारक संस्था व महात्मा गांधी ग्रंथालय व वाचनालयाचे अध्यक्ष अरविंद गणपत वनगे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले तर पेण कोनायस्‌न्स स्कूलच्या शाळेचा ध्वजारोहण शुभांगी नेने यांच्या हस्ते करण्यात आले. पेण सार्वजनिक विद्यामंदिर ज्युनियर कॉलेजचा ध्वजारोहण अध्यक्ष ऍड. पी.डी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तर ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर सार्वजनिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी पुर्ण पेण शहरात ढोल ताशाच्या गजरात प्रभात फेरीकाढली.
पेण च्या इतिहासात प्रथमच प्रांत कार्यालय पेण येथे मानवंदना परेड घेण्यात आली. यामध्ये चार तुकडीने भाग घेतला होता. तर यामध्ये पेण पोलीस ठाणे 21 कर्मचारी दुसर्‍या तुकडीमध्ये आर.एस.पी चे 16 विदयार्थी , तिसर्‍या तुकडीमध्ये स्काउड गाईडचे 16 विदयार्थी तर चौथ्या तुकडीमध्ये पेण प्रायव्हेट हायस्कूल ज्युनइर कॉलेजचे 16 विदयार्थी असे सहभागी झाले होते. त्यानंतर सौ.म.ना.नेने कन्याविदयालय पेण संविधानावर आधारित पथ नाटय, भाउ साहेब नेने महाविदयालय तर्फे स्वच्छता अभियान पथ नाटय, प्रायव्हेट हायस्कूल आणि सौ.म.ना.नेने कन्याविदयालय आर.एस.पी सिग्नल प्रकार सार्वजनिक विदयामंदीर कडून ढोल पथक प्रात्याक्षिक आणि आय.डे.केअर या मुलांकडून वंदे मात्‌रम या गीतवर नृत्य सादर करण्यात आले. तर आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते शेतकर्‍यांना ऍग्री स्टॉक योजने अंतर्गत प्रमाणपत्र देण्यात आले. सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नायब तहसिलदार प्रसाद कालेकर यांनी केले. पूर्ण पेण तालुक्यात मोठया उत्साहात प्रजासत्ताकदिन साजरा करण्यात आला.