पेण ः प्रतिनिधी
पेण भाल विठ्ठलवाडी येथील विठ्ठल रखुमाई संपूर्ण वाशी पंत्रक्रोशीतील प्रसिध्द व मितभाषी असलेले पुरोहित यांचे नुकतेच दिर्घ आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी ते 80 वर्षांचे होते. त्यांना मुलगा, मुलगी, सून, व नातू असा त्यांचा परिवार आहे. विठ्ठलाचे पुजारी दिवाकर भिडे यांचा मूळ रहिवास रत्नागिरी येथील. आपले नशीब अजमावण्यासाठी ते भाल विठ्ठलवाडीत आले. गावकर्यांनी त्यांना विठ्ठलाची पूजाअर्चा करण्याचा आग्रह केला. तेव्हापासून वडील नारायण कृष्णा भिडे, बंडया उर्फ दिवाकर नारायण भिडे, मुलगा धीरज नारायण भिडे हे तिसर्या पिढीपर्यंत विठ्ठलाची पूजाअर्चा कोणताही मोबदला न घेता आजपर्यंत सेवा उदार मनाने करीत आहेत. बंडोबा वास्तूशांती, सत्यनारायणाची पूजा, अभिषेक, ग्रहशांती, दिवसकार्य या सर्वांचे ते पौराहित करीत. यासाठीचे त्यांनी कधीही पैसे घेतले नाहीत. ते वेळप्रसंगी सर्वसामान्यांना मदत करीत असत त्यांच्या जाण्याने खारेपाट विभागात हळहळ व्यक्त केली जात आहे.
