पेण ः- प्रतिनिधी
पेण तालुक्यातील वडखळ अंगणवाडीमध्ये महाराष्ट्र शासनाकडून 6 महिने ते 3 वर्षाच्या बालकांसाठी येणार्या खाउचे वाटप सुरु असताना एक पिशवीमध्ये अंगणवाडी सेविकांना संशयास्पद कडक वस्तू असल्याचे अढळून आले. त्यावेळी त्यांनी ते पाकीट फोडले असता त्यामध्ये कुजलेल्या अवस्थेत उंदीर अढळून आला. त्याच वेळी तातडीने अंगणवाडी सेविकेने समोरच ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सरपंच व सदस्य उपस्थित होते. त्यांना बोलावून घेउन झालेला प्रकार सांगितला. मा. सरपंच योगेश पाटील यांनी गर्जा रायगडच्या प्रतिनिधींना भ्रंमती ध्वनीवर संपर्क करुन बोलावून घेतले. आमच्या प्रतिनिधींनी जाउन पाहिले तर संपूर्ण अंगणवाडीत दुर्गंधी सुटलेली होती. तर उंदीर पाकीटात असलेल्या खाउला देखील दुर्गंधी सुटली होती. आमच्या प्रतिनिधीनी तातडीने तालुका एकात्मिक बालविकास अधिकरी प्रवीण पाटील यांना संपर्क केला. परंतू प्रवीण पाटील यांनी थातूरमातूर उत्तर देउन परिस्थितीचे गांभीर्य जाणून घेतले नाही. त्यावेळेला आमच्या प्रतिनिधींनी रायगड जिल्हयाचे कार्यकारी मुख्याधिकारी भरत बास्टेवाड यांना संपर्क केला. आणि सर्व फोटो व्हाटसपद्वारे दिले त्यावेळेला मात्र प्रशासनाची हालचाल सुरु झाली. विस्तार अधिकारी डी.एच.जाधव हे घटनास्थळी पोहचले. त्यांच्या अगोदर परवेशिका रश्मी झेमसे यांनी घटनास्थळी येउन पंचनामा करण्यास सुरूवात केली हेाती.
महत्वाची बाब म्हणजे मल्टी मिक्स सिरीयल्स ऍन प्रोटिन्स या पाकीटमध्ये पाव किलोच्यावर उंदीर होता. यदा कदाचित अंगणवाडी सेविकेच्या नजरेतून ही बाब लक्षात आली नसती तर, सर्वसामान्य मुलांच्या आरोग्याशी खेळ झाला असता. झालेला सर्व प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेउन आज नव्याने पेण तालुक्याचा गटविकास अधिकार्याचा भार सांभाळणार्या सोनल सुर्यवंशी यांनी वडखळ येथे विस्तार अधिकारी आणि सहाय्यक गटविकास अधिकारी यांना घेउन वडखळ अंगणवाडीला भेट दिली व तातडीने पंचनामा करण्यास सांगितला.
दोषींवर कारवाई झाली पाहिजे ः- योगेश पाटील मा.सरपंच वडखळ
अन्न पदार्थ पुरवणार्या ठेकेदाराला जर ठेका देत असेल तर ते चुकीचे आहे त्यातच हा ठेकेदार देखील महाराष्ट्रातील नसून राजस्थानचा आहे. त्यामुळे ठेकेदाराला महाराष्ट्रातील विदयार्थ्यांशी काहीही घेणेदेणे नाही अशा ठेकेदारावर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे.
बालविकास विभागाच्या अधिकार्यांना तातडीने वडखळ येथे पाठवतो. ः मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड
वडखळ येथील झालेला प्रकार मुख्य कार्यकारी अधिकार्यांना भ्रंमती ध्वनीवरुन सांगितल्यावर त्यांनी तातडीने बाल विकास विभागाच्या अधिकार्यांना वडखळला पाठवून पंचनामा करण्याचे आदेश दिले.
