पेणःप्रतिनिधी
पेण नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात मे. हावरे ग्रँड यांच्या तर्फे अनिल कुमार सिंघ व उज्वला सतिश हावरे यांच्या नावे सर्वे नं. 256अ/1, 256अ/2 हे सातबारे आहेत. त्याच्याच शेजारी असलेल्या 256अ/3 हा महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ क्षेत्र विकास या नावाने म्हाडाचा सातबारा आहे. हावरे गु्रपने स्वतःची जागा सोडून महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ क्षेत्राच्या जागेवर बांधकाम केले आहे ते ही, बेकायदेशीर पेण नगरपालिकेतून कोणत्याही प्रकारचा बांधकाम परवाना घेतलेला नाही. स्वतःच्या मर्जीने म्हाडाच्या जागेत बिनधास्तपणे बांधकाम केले आहे. तसेच लगतच्या शेतकर्यांचे देखील ये-जा करण्याचे मार्ग आडविले आहे. असे वृत्त साप्ताहिक गर्जा रायगडमध्ये प्रसिध्द केल्यानंतर तहसिलदार तानाजी शेजाळ यांनी तातडीने पेण मंडळ अधिकारी सुजाता जाधव व पेण तालाठी अनिकेत पाटील यांना घटनास्थळी पंचनामा करण्यास पाठविले. मात्र पंचनामाच्या वेळेला हावरे ग्रुपकडून कुणीही हजर राहिले नाही. तसेच जे देखरेख करणारे कर्मचारी होते त्यांनी स्वतःचे मोबाईल बंद करून ठेवले होते. शेतकरी अमित पाटील घटनास्थळी आपल्या कागदपत्रांसह हजर होते तर प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी देखील घटनास्थळी हजर होते. यावेळी सुजाता जाधव पेण मंडळ अधिकारी यांनी सदरील जागेचा पंचनामा केला. प्रथम दर्शनी अतिक्रम झाले असल्याचे दिसत आहे असे ही त्यांनी सांगितले. तसेच नॅशनल हायवेची जागा देखील हावरे ग्रुपने पत्रे मारून आतमध्ये घेतली असल्याचे सांगितले. एकंदरी काय तर हावरे ग्रुप मनामनी करून सरकारी जागेवर अतिक्रमण करत असून मुळच्या शेतकर्यांचे रस्ते सुध्दा बंद करत असल्याचे दिसत आहे.
या बाबत तहसिलदार तानाजी शेजाळ यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की नॅशन हायवे, हावरे ग्रुप, नगरपालिका, म्हाडा यांची संयुक्तरित्या बैठक प्रांत कार्यालयात ठेवणार असून नव्याने जागेची सिंमाक निश्चित करून घेणार आमच्या कर्मचार्यांनी पंचनामा केला आहे पंचनाम्यानुसार घटनास्थळी काही गोष्टी संशयास्पद आहेत. मात्र या बाबत लवकरात लवकर संयुक्त बैठक लावली जाईल.
