वारीचा समावेश युनेस्कोच्या यादीत व्हावा ः- खासदार धैर्यशील पाटील

Political

पेण ः प्रतिनिधी
राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील यांनी नुकत्याच संसदेच्या अधिवेशाच्या दरम्यान महाराष्ट्राची ओळख असणार्‍या पंढरीच्या वारील युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत सामाविष्ट करण्याचा सरकारने विचार करावा अशी मागणी केली. मागणी करत असताना धैर्यशील पाटील यांनी सांगितले की,
पंढरपुरची वारी 1000 वर्षांची जी परंपरा आहे ती, युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिकमध्ये स्थान मिळवण्यासाठीचा माझा प्रश्र्न आहे. पंढरपुरची वारी जी पंढरपूर तिर्थ क्षेत्राची यात्रा होते. 1000 वर्षापासून ती चालत आलेली आहे. अनेक जाती, धर्म, पंथ, प्रांत  हा भेदभाव मानत नसताना समता आणि बंधूत्वाचा धडा शिकवत असताना करोडो वारकरी सांप्रदायीक भक्तलोक महाराष्ट्र, आंध्रप्रदेशातून, कर्नाटक काही गावातून येत असतात वारीची संस्कृती संतांनी जपली आहे. संत ज्ञानेश्र्वर माउली, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव यांनी आपल्या विचारांनी महाराष्ट्राची भुमी वारकरीमय केली आहे. आज जो प्रगतशील महाराष्ट्र दिसत आहे याचे महत्वाचे कारण म्हणजे पंढरपूर ची वारी आहे म्हणूनच पंढरपूरच्या वारीला युनेस्कोच्या यादीत समावेश करावे.
यावेळी खासदार धैर्यशील पाटील यांच्या प्रश्र्नाला उत्तर देताना. सांस्कृतिक केंद्रीय मंत्री गजेंद्र सिह शेखावत यांनी सांगितले की, आपल्या देशामध्ये अनेक प्रथा आहेत या प्रथांमूळे भारत विविधतेत एकता प्रदान करत आहे. मात्र दोन वर्षांनंतर एक प्रस्ताव एक देश पाठवू शकतो आपण दिवाळी हा सण 2023 मध्ये पाठवला आहे. त्याला 2025 ला मान्यता मिळले. त्यानंतर आपण पंढरपूरच्या वारीचा विचार करु. यानंतर धैर्यशील पाटील यांनी संत श्रेष्ठ तुकोबारायांची अभंग वाणी डिजीटल स्वरुपात संग्रहित सरकारमार्फत करण्यात येईल का? या प्रश्र्नाला उत्तर देताना सांस्कृतिक केंद्रीय मंत्री गजेंद्र सिह शेखावत यांनी सांगितले की, आपल्या संस्कृतीला मदत करणार्‍या अनेक बाबी वेळेनुसार लुप्त होउ नये म्हणून सरकार अनेक प्रकारचे प्रयत्न करीत आहे. या अगोदर जगत गुरू प्रवाह या नावाने आपण काम केलेले आहे पुढेही अभंग वाणी जतन करण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करणार.