इंडोअर मैदानाचे भुमिपूजन

क्रीडा

पेण ः प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडइमच्या बाजूला इंडोअर क्रिकेट मैदानाचे भुमिपूजन रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएनचे अध्यक्ष अनिरुध्द पाटील यांच्या हस्ते करण्यात आलेे यावेळी मा.नगरसेवक शोमेर पेणकर, मा.नगरसेवक संतोष पाटील, अरुण शिंदे, संजय म्हात्रे, रविंद्र म्हात्रे (पप्पू सर), यांच्या उपस्थित पार पडले. यावेळी बोलताना रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएनचे अध्यक्ष अनिरुध्द पाटील यांनी सांगितले की, आज धावपळीच्या जीवनामध्ये क्रिकेटपासून अनेक क्रिकेटप्रेमी दूर चाललेले आहेत. त्यामुळे रायगड जिल्हयात प्रथमच आपण इंडोअर खेळपट्टी तयार करत आहोत जेणेकरुन रात्रीच्यावेळी अथवा सकाळी पहाटे क्रिकेटप्रेमी आपले क्रिकेटचे वेड पूर्ण करतील. आज जे भुमिपूजन झाले आहे हे भविष्यातील एक वैशिष्ट पुर्ण वास्तूचे भुमिपूजन झाले आहे. यासाठी खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवीशेठ पाटील हे आमच्या बरोबर आहेत. त्यामुळे निधीची कमतरता भासणार नाही. तर यावेळी नगरसेवक शेामेर पेणकर मा. नगसेवक संतोष पाटील व अरुण शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.