नवतरुण कारावी संघाने 14 वर्षांनंतर जिल्हा अजिंक्यपद पटकावले

क्रीडा

पेण ः प्रतिनिधी
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि वैकुंठ पाटील मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जय भवानी वाशी आणि वरसुआई वाशी यांच्या सहकार्याने रायगड जिल्हा अजिंक्य प्रौढ पुरूष व महिला गटाची निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन छत्रपती संभाजी महाराज मैदान वाशी वढाव रोड येथे दिनांक 7 ते 9 फेब्रुवारी या दरम्यान करण्यात आले होते. त्यामुळे तीन दिवस पेणसह रायगडकरांना कबड्डीचा थरार पहायला मिळाला. या स्पर्धेसाठी रायगड जिल्हयातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रिडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेट दिली. आणि या स्पर्धेला चारचॉंद लावले.
तब्बल 14 वर्षानंतर नवतरूण कारावी संघाने जिल्हा अजिंक्यपद पटकावले मधल्या काळात कारावी संघामध्ये अनेक चढउतार झाले. एक संघाचे दाने संघ झाले मात्र पुन्हा एकदा एकत्र झाल्यानंतर जिल्हयाला कारावी संघाचा थरार पहायला मिळाला. मिथुन मोकल यांच्या चौङ्गेर चढायांनी क्रिडा रसिकांची मने जिंकली मधल्या काळात मिथुन मोकल कबड्डी पुन्हा खेळेल की नाही. असं वाटत होतं परंतू, मिथुन मोकल यांच्या जिद्दी पूढे कोणाचेही चालले नाही. हेच आज त्याच्या प्रदर्शनावरुन दिसले. कारावी संघाने अजिंक्यपद पटकावताच जुने जाणते राष्ट्रीय खेळाडू संजय मोकल यांना अश्रु अनावर झाले. तर हनुमान धेरण हा संघ 2024 मध्ये पहिल्याच फेरीत स्पर्धेमधून बाहेर पडला होता. परंतू आज पुन्हा त्यांनीही आपल्या जिद्दीचे प्रदर्शन करत कारावी संघाला अंतिम फेरीत नाकीनउ आणले होते. तर गणेश दिवलांग तृतीय, मातृछाया चतुर्थ, कबड्डी प्रौढ गट स्पर्धेत पुरुष असे क्रम पटकावले तर महिला गटात कर्नाळा स्पोर्ट पनवेल संघाने सहाव्यादा विजेत पद जिंकले, परंतू अतिंम सामन्यामध्ये सामनाधिकार्‍यांनी वेळेचे भान न राखता अतिंम चढाई तीस सेकंद पेक्षा जास्त वेळेची देउन पनवेल स्पोर्ट पनवेलवर एक प्रकारचा अन्यायच केला त्यामुळे द्वितीय पनवेल स्पोर्ट पनवेल, तृतीय भिल्लेश्र्वर किहीम, चतुर्थ ओमकार वेश्र्वी असे संघ विजेते झाले. या स्पर्धेला छत्रपती पुरस्कार विजेते प्रमोद म्हात्रे, संजय म्हात्रे, आशिष म्हात्रे आणि सुधीर पाटील यांनी देखील आपली हजेरी लावली. त्याचप्रमाणे अर्जून पुरस्कार विजेती अभिलाषा म्हात्रे यांनी देखील आपली हजेरी आपल्या मायभुमीत लावली.
एकंदरीत स्पर्धा नेटनेटकी पार पडली. वैकुंठ शेठ मित्र मंडळाचे अध्यक्ष वैकुंठ पाटील व मिलिंद पाटील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अपार मेहनत घेतली. परंतू, या मेहनतीवर सामना अधिकार्‍यांच्या बेजबाबदार कामगिरीमुळे कळत-नकळत एक काळा डाग लागलाच.