गर्जा रायगडचा 10 वा वर्धापन दिन व गर्जा रायगड रत्न सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार धैर्यशील पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, पत्रकार म्हटलं की, सर्व प्रकारच्या माणशांसी वाद विवाद होत असतात परंतू, संतोष भाईने तात्वीक वाद केले. ते संपताच त्यांनी सर्वांशी जूळवून घेतलेले मी पाहिले आहे. त्यामुळे माणस तोडली नाहीत ते जोडण्याचे काम केले.
पुढे धैर्यशील पाटील म्हणाले की, चांगल्या कार्यक्रमाची आणि कार्यक्रम कसा करावा याची वहिवाट संतोष भाई साधारणताः10 वर्ष पुर्वी केली. चांगला कार्यक्रम होत असताना तो केवळ चांगला व्हावा आणि तो समाजापयोगी व्हावा. म्हणून पेणसह रायगड जिल्हयातील गुणवंत्ताचा सत्कार करावा आशा प्रकारची कल्पना मांडली गेली. आणि त्यातून अनेक माणस जोड जोडत कुटुंब वाढवलं.
राजकीय पत्रकारीतामध्ये किती ही वाद झाले तरी तो विषय संपल्यावर जूळवून घेत. कधीही माणस तोडली नाहीत ती, जोडलीत. ही आत्ता पर्यंत मी बघितली . संतोष भाई हा आमच्या घरातील, आमच्या कुटुंबातील एक प्रमुख सदस्य आहे. माझ्या व्यक्तीगत अडअडचणीच्यावेळी तो सोबत एकत्र राहिला. जे काय आंगावर येईल ते एकत्रीत घेतले जो काय मार बसेल तो एकत्रीत घेतला आणि काही पावसाच्या चांगल्या सरी आल्या त्याही एकत्रीत घेतल्या आज खासदार धैर्यशील पाटलाचा सत्कार नाही तो आपल्या दादाचा सत्कार आहे. याची पूर्णताः मला जाणीव आहे. समाज्यासाठी प्रामाणिक काम करणार्या व्यक्तींचा स्विकारीकरण करणे व त्यांच्या कामाची पोहच पावती सत्कार करुन देणे ही ही बाब कौतुकाची आहे. तुम्हास सर्वार्थी आशिर्वाद दयावे असे धैर्यशील पाटील यांनी सांगितले.
गर्जा रायगड हा संतोष भाईचा आत्मा आहे. ः ऍड निलिमा पाटील
गर्जा रायगड हा नुसताच साप्ताहिक नसुन संतोष भाईचा तो आत्मा आहे त्याला त्याशिवाय दुसरे काहीच सुचत नसतं सतत गर्जा रायगडबाबत तो विचार करत असतो. एखादी गोष्ट त्याच्या डोक्यात गेली की तो आपल्या शरसंधान या मथल्यात समोरच्याला सरळच करत असतो. मग त्याला सांगाव लागत की जरा शांतता घे. तो समाजाचे भान राखून गर्जा रायगड साप्ताहिक चालवत आहे. त्यामुळे समाजात काम करणार्या योग्य व्यक्ती हेरुन त्यांना गर्जा रायगड रत्न पुरस्कार देत असतो. आज कार्यक्रम संपला की त्याची उदयापासून सुरुवात होते की पुढच्या 9 फेब्रुवारी आपल्याला पुरस्कार कोणाला दयायचा आहे आणि असा तो गेली 9 वर्ष करीत आहे.
पुढे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, एखादे पत्र चालवायचं, साप्ताहिक चालवायचं, एखादं न्यूज चॅनल चालू करायचा म्हणजे काय खाउ नाही. एखादं पत्र दर आठवडयाला चालू करायचा त्यासाठी बातम्या तयार करायच्या, त्यासाठी कागदं गोळा करायची, त्यासाठी लिखाण करायच, त्यासाठी या सार्या मंडळींना एकत्र ठेवायचे हे सारे कष्ट त्याचे आम्ही कित्येक वर्ष पाहत आलो आहोत आणि त्या कष्टाला मी त्याची नेहमीची सोबत आहे. इतके कष्ट तो स्वतःहून घेत असतो. आणि त्यातून स्वतःच्या घरातलेच पैसे घालून हा सारा लवाजमा चालवता मी त्याला पाहिले आहे. संतोष भाई मला तुम्हाला धन्यवाद दयायचे आहे. गर्जा रायगड सारखा चांगला साप्ताहिक तुम्ही आम्हा पेणकरांनाच नाही तर रायगडवासियांना देत आला आहात. परत एकदा अभिनंदन करीत आहे आज तुम्ही गर्जा रायगड साद संवाद सारखा चॅनल चालू करत आहात. आणि त्याद्वारे तुम्ही समाजात असलेल्या चांगल्या गोष्टी, चांगली माणसं यांची समाजाला पुन्हा एकदा त्यांची ओळख करुन देणार आहात. ही बाब एवढी सोपी नाही परंतू आपण शिवधनुष्य गेली 10 वर्ष पेलले आहात.
खरचं खुप खुप छान सन्मान सोहळा अतिशय दर्जेदार सोहळा, तितकाच चांगलं नियोजन व सादरीकरण. आपण व आपल्या सहकार्यांनी अगदी शीर्षकाप्रमाणे रत्नांची पारख करुन त्यांचा यथोचित सन्मान केलात. जे 7 सन्मान तुम्ही केलेत आणि त्यांची निवड तुम्ही केलीत त्यासाठी खरचं तुमचं कौतुक. तुम्ही करत असलेलं कार्य आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी वाखाणण्यासारखी आहे. तुमच्या नवीन येणार्या चॅनल साठी खूप खूप शुभेच्छा. माझे मित्र विनादे म्हात्रे यांचे सूत्रसंचालन कौतुकास्पद होते, वैभव घरत हयांचे अंगावर शहारा आणणारे पोवाडे. निलिमा ताई हयांनी समर्पक शब्दांत व्यक्त केलेल्या भावना, तुम्ही आपल्या आई च्या हस्ते शंभु राज्यांवरील विशेष अंकाच केलेलं प्रकाशन, आणि न्यायाधीश ऋचा म्हात्रे हयांच्या प्रमुख उपस्थितीत केलेले सन्मान हयाने कार्यक्रमाचा दर्जा खूप उंचावला. खरचं तुम्हाला मनापासून खुप खुप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. ः- युवा शास्त्रज्ञ अनिरुध्द पाटील
नेटके आणि परिपूर्ण आयोजन करुन विविध क्षेत्रातील कर्तबगारांना सन्मानित करताना आपल्या उदार अंतःकरणाची प्रचिती येते. अशा कार्यक्रमामुळे पेणच्या सांस्कृतिक क्षेत्राला उर्जा मिळत आहे. ः-डॉ. विनायक पवार
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गर्जा रायगड वर्धापन दिनाच्या पुरवणीचा अनावरण करण्यात आले तर कु.दिशा पुनम संतोष पाटील हिच्या हस्ते गर्जा रायगड साद संवाद या वृत्त वाहिनीच्या प्रोमोचे अनावरण करण्यात आले तसेच यावेळी अवनी पाटील (नवि मुंबई), डॉ.विनायक पवार (पेण), राजेंद्र जोशी (पेण), चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया (सी.एफ.आय.पेण), अग्निशामक दल (पेण), तर विशेष पुरस्कार गोपीनाथ रामचंद्र पाटील (निवृत्त पोलीस निरिक्षक) यांना गर्जा रायगड रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी खासदार धैयशील पाटील, रुची मंदार म्हात्रे सह दिवानी न्यायाधीश कनिष्ठ विभाग व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग ठाणे, अनिरूध्द पाटील युवा शास्त्रज्ञ, जीवन पाटील मुख्याधिकारी पेण न.पा., संदीप बागुल पोलीस निरिक्षक पेण, प्रसाद पांढरे पोलीस निरिक्षक वडखळ, ऍड.निलीमा पाटील मा.अध्यक्षा तथा अर्थ व बांधकाम सभापती, डी.बी.पाटील मा.जि.प. सभापती, प्रभाकर म्हात्रे मा.जि.प.सदस्य, पेण कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष महादू मानकर, देवेंद्र पाटील कृ.उ.बा.स.संचालक पनवेल, वैकुंठ पाटील मा.जि.प.विरोधी नेते, अनिरूध्द पाटील मा.न.पा.प्रतोद पेण तथा रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष, योगेश पाटील मा.सरपंच तथा विदयमान सदस्य वडखळ, महेश देसले ज्येष्ठ विधी तज्ञ, स्वप्निल म्हात्रे युवा मोर्चा अध्यक्ष भाजप तालुका पेण तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतीक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.