पेणःप्रतिनिधी
प.पू.श्री सद्गुरू ब्रम्हचैतन्य स्वामी महाराज गोंदवलेकर यांचे अनुयायी महेश वसंत हेलवाडे हे दर वर्षी माघ गुरूप्रतिपदा गेली कित्येक वर्ष साजरा करत आले आहेत. यावर्षी देखील श्री राम लक्ष्मण सीतामाई हनुमानजी मंदिर, दातार आळी येथे उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये सकाळी पहाटे 5ः30 ते 6ः30 एकात्मता स्तोत्र, भूपाळया, काकड आरती, वेदघोष, सकाळी 6ः30 ते 8ः00 प.पू.महाराजांच्या पादुकांवर रूद्राभिषेक व पूजा, सकाळी 8ः30 ते 10ः00 श्रीराम नाम जप, सकाळी 10ः00 ते 12ः00 कीर्तन ह.भ.प. मयुरेशबुवा केळकर, पुणे, दुपारी 12ः00 ते 2ः00 महाप्रसाद, दुपारी 3ः30 ते 5ः00 सौ.श्रीया भागवत (संगीतोपचार तज्ञ) संगीतोपचार माहिती व्याख्यान, सायं. 5ः30 ते 8ः30 कीर्तन ह.भ.प. सौ. मानसी श्रेयस बडवे, पुणे यांचा राणी पद्मावती यांच्या जिवनावर किर्तन झाले. मयुरेश बुवा केळकर व मानसी बडवे यांच्या किर्तनाने उपस्थितांची मनं जिंकली.
गुरूप्रतिपदेचा उत्सव हा पेणकरांसाठी एक वेगळीच परवणी असते. या उत्सवामध्ये सकाळच्या सत्रात आणि संध्याकाळच्या सत्रात सुश्राव्य किर्तनाची मेजवाणी पेणकरांना मिळते. हा कार्यक्रम महेश हेलवाडे व त्यांचे कुटुंबिये करत असतात.
