शिर्की येथे कास्प-ईडीएमएम तर्फे ख्रिसमस सण साजरा

Uncategorized

पेणःप्रतिनिधी
कास्प रायगड युनिटच्या शिर्की येथील बालसंस्कार वर्गात ख्रिसमस व नविन वर्षाच्या आगमनासाठी ख्रिसमस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. नाताळ सणामध्ये भेटवस्तू देण्याची प्रथा असल्याने बालवाडीतील मुले या पार्टीची खुप वाट पाहत असतात. सांताक्लॉजच्या वेशात तयार झालेल्या मुलांच्या हस्ते बालवाडीतील मुलांना भेटवस्तू व खाउ देण्यात आले. सर्व मुलांच्या चेहर्‍यावर आनंद पसरला होता. मुलांनी हा सण अत्यंत आनंदात व उत्साहात साजरा केला.
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी बालवाडी शिक्षिका शुभांगी पाटील व वर्षा पाटील यांनी मोलाची मदत केली. कास्प प्रकल्प व्यवस्थापिका निवेदिता ठाकोर, सोशल वर्कर किरण कदम यांनी या कार्यक्रमाचे नियोजन योग्य पध्दतीने पार पाडले.