संकेत म्हात्रेची भरीव कामगिरी

Raigad

पेण ः- प्रतिनिधी
49 वी कोकण परिक्षेत्रिय क्रिडा स्पर्धा नुकतीच पालघर येथे पार पडली. या स्पर्धेमध्ये मोरा सागरी पोलिस स्टेशनचे जलतरण पट्टू संकेत केशव म्हात्रे याने भरीव कामगिरी करत पाच सुर्वण, एक रजत आणि एक कास्य अशी पदकं पटकाविले आहेत.
पोलिस खात्याकडून दरवर्षी क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. 24, 25 डिसेंबर या वर्षाच्या क्रिडा स्पर्धा पालघर येथे घेण्यात आल्या होत्या. यामध्ये सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या जिल्हयातील पोलिस खात्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये जलतरण स्पर्धेमध्ये पेण तालुक्यातील पाटणेश्र्वर गावचा सुपूत्र तथा मोरा सागरी पोलीस स्टेशनचा पोलिस हवालदार संकेत म्हात्रे याने जलतरणच्या 50 मीटर फ्री स्टाईलमध्ये सुर्वण पदक, 50 मीटर बॅक स्ट्रोक सूवर्ण पदक, 100 मीटर फ्री स्टाईल सूवर्ण पदक, 100 मीटर बॅक स्ट्रोक सूवर्णपदक, 200 मीटर आयएममध्ये सूवर्णपदक, 4बाय 100 मीटर फ्री स्टाईल रीले रजत, 4 बाय 100 मीटर आयएम रीले कास्य पदकं पटकाविली आहेत. त्याच्या या यशाबद्दल मोरा सागरी पोलिस स्टेशनच्या अधिकारी वर्गाकडून तसेच पाटणेश्र्वर ग्रामस्थांकडून त्याचे अभिनंदन केले जात आहे.