खोटा शेतकरी दाखला वापरून जमिन केली खरेदी

Crime

पेण ः प्रतिनिधी
वामन रामचंद्र माडये या मुंबईतील इसमाने मौज पाटणोली येथील 223/0 सदरची जमिन खरेदी करताना तो स्वतः शेतकरी नसताना त्याने सदरच्या जमिन खरेदीसाठी मौजे सापोली येथील गट क्रमांक 60/0 या जमिनीचे मालक व शेतकरी असल्याचा सातबारा जोडला. सदरचा सातबारा हा मौजे सापोली ता.पेण येथील श्री. युनूस अजिम खान रा. खानमोहल्ला ता.पेण यांच्याकडून 2011 मध्ये खरेदी केला. परंतू ही जमिन खरेदी करताना देखील वामन माडये यांनी मौजे पानसई ता.माणगाव येथील 198/6 चा खोटा सातबारा जोडून आपण शेतकरी असल्याचा कागांवा केला. परंतू खरं पाहता मौज पानसई येथील 198/6 या सातबार्‍याशी वामन माडये संबंध नसताना खोटा सातबारा तयार करुन पेण येथील दोन ठिकाणी जमिनी खरेदी केल्या. त्याचप्रमाणे झोन दाखल्यामध्ये देखील वामन माडये यांनी फेरबदल केला. मुळ दाखल्यावर सुर्यकांत पोशा पाटील रा.पाटणोली.ता.पेण यांच्या नावे असताना त्या दाखल्यावर नाव बदलून राजेंद्र रामचंद्र पाटील रा. सागाव ता. अलिबाग हे खोटे नाव नमुद करुन नावात बदल केला आहे. अशाप्रकारे पेण तालुक्यात सापोली, महाड तालुक्यात दासगाव, येथे जमिनी खरेदी करताना दाभोली, वेंगुला, सिंधुदूर्ग, अशा ठिकाणी खोटया कगदपत्रांचा वापर करुन वामन माडये यांनी जमिनी खरेदी केल्याचे उघडकीस आले आहे.
महत्वाची बाब म्हणजे पाटणोली येथील माधव नारायण शहाणे यांच्या कुंटूबाची जमिन कुळांना वगळून खरेदीखत केल्यानंतर कुळ सुर्यकांत पाटील यांनी झालेली सवणूक उघडकीस आणली आहे. त्यानंतर पेण पोलीस ठाण्यात वामन रामचंद्र माडये यांच्याविरुध्द भा.द.सं 465,468,471,420,34 अन्वये वामन माडये व अमोल कामत यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक तपास पेण पोलीस ठाणे करत आहे.