चारुदत्त चिखले लिखित शिवचरित्राचे मान्यवरांच्या उपस्थिती दिमाखदार प्रकाशन

State

शिवायन पूर्वार्ध व उत्तरार्ध या दोन भागांतील पुस्तकांचे प्रकाशन

पेण ः- प्रतिनिधी
वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमा अंतर्गत चारुदत्त चंद्रकांत चिखले लिखित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कथा काव्यगीत स्वरुपातील शिवचरित्राचे शिवायन पूर्वार्ध व शिवायन उत्तरार्ध या दोन भागांतील पुस्तकांचा प्रकाशन सोहळा महात्मा गांधी वाचनालय येथील सभागृहात अतिशय दिमाखदार पद्धतीने पार पडला.
याप्रसंगी कस्टम्स व इनडायरेक्ट टॅक्सेस प्रधान आयुक्त यशोधन वनगे, नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या बाराव्या वंशजा सहयाद्री कन्या डॉ. शीतल शिवराज मालुसरे, रायगड जि.प.माजी अध्यक्षा निलिमाताई पाटील, पेणच्या माजी नगराध्यक्षा प्रितम पाटील, समाजसेविका डॉ. समीधा गांधी, महात्मा गांधी वाचनालय संस्थेच्या उपाध्यक्षा सपना पाटील, मा. नगराध्यक्ष गुरुनाथ मांजरेकर, सहित प्रकाशन गोवाचे सागर शिंदे, शांता भावे व पेण नगरीतील वाचक व शिवप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी शिवायनच लेखक व कवी चारुदत्त चिखले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र साध्या, सोप्या व रंजक पद्धतीने, गीत रामायणासारख्या कथा व काव्यगीते या आकृतिबंधात सादर व्हावे अशी फार वर्षांपासून तीव्र इच्छा असल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र शिवायन आज पुस्तकरुपाने प्रकाशित होताना आनंद व समाधान वाटत असल्याचे सांगितले, महिलांच्या सुरक्षिततेसाठी शिवरायांचा आदर्श सर्वच पातळयांवर अगिकारणे आवश्यक असल्याची भावनाही त्यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केली. यशोधन वनगे यांनी चारुदत्त चिखले यांच्या कडून लिहिले गेलेले शिवायन उच्च प्रतिचे असल्याचे नमूद करुन, प्रशासन चालविताना शिवरायांचा अभ्यास खूपच उपयोगी पडल्याचे या वेळी सांगितले.  शीतल मालुसरे यांनी शिवरायांचे संपूर्ण चरित्र शिवायन द्वारे श्री. चारुदत्त चिखले यांनी ज्याप्रकारे काव्यात मांडले आहे तसे मांडणे ही खूपच अवघड गोष्ट असल्याचे नमूद करुन हे शिवायन अत्यंत रोमांचकारी असून ते प्रत्येकाने वाचलेच पाहिजे असे मत या वेळी व्यक्त केले. समीधा गांधी यांनीही जिजाउसाहेबांचा आदर्श सर्वच मातांना प्रेरणादायी असल्याचे नमूद करुन वीर करुण रसानी भरलेले हे शिवायन वाचताना आपण खूपच भारावून गेल्याचे सांगितले.
याप्रसंगी शिवायनचे पहिले मुद्रीतशोधन केलेल्या  शांता भावे यांनी शिवायनमधील रचनांचा अभ्यास शांता भावे यांनी शिवायनमधील रचनांचा अभ्यास करताना आपल्याला वेगळीच अनुभूती आल्याचे सांगितले व या शिवायनचे जास्तीत जास्त कार्यक्रम व्हावेत व हे शिवायन गीत रामायणाप्रमाणे घरोघरी पोहचवावे अशी भावना यावेळी व्यक्त केली.  जि.प.माजी अध्यक्षा ऍड. निलीमाताई पाटील यांनी हे शिवायन कार्यक्रम स्वरुपात आणण्यासाठी आपण आवश्यक ती मदत करणार असल्याचे यावेळी सांगितले.  तसेच  पेण मा. नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनीही शिवायनचे रचनाकार श्री. चारुदत्त चिखले यांचे अभिनंदन करुन हे शिवायन घरोघरी नक्कीच पोहोचेल अशा सद्भावना यावेळी व्यक्त केल्या. तसेच महात्मा गांधी वाचनालय संस्थेच्या उपाध्यक्षासपना पाटील यांनी वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमा अंतर्गत सदरचा शिवायन प्रकाशन सोहळा संपन्न होत असल्यामुळे आनंद होत असून याप्रसंगी त्यांनी संस्थेकडून चालविण्यात येत असलेल्या वाचन उपक्रमांची माहिती सांगितली. या प्रकाशन सोहळयात शिवायन मधील काही भागांचे  मोनीका ठाकूर यांनी अभिवाचन केले व शिवायन मधील गीते गीत शिवायन या कार्यक्रमाअंतर्गत गायक संतोष पाटील यांनी अतिशय उत्कटतेने सादर केली, त्यामुळे रसिक भारावून गेले. कार्यक्रमाची सांगता शिवायनमधील शिवरायांच्या आरतीने झाली.