भाजी मार्केटच्या लॉकच्या डुबलीकेट चाव्या तयार
नगरपालिका कर्मचार्यांचा पाठिंबा
पेण ः प्रतिनिधी
महाराष्ट्र भूषण आदरणीय तिर्थरुप नाना साहेब धर्माधिकारी यांच्या नावाने पेण नगरपालिकेमार्फत भाजी मार्केट कम शॉपिंग मॉल बांधण्यात आला आहे. या भाजी मार्केटमध्ये रस्त्याअभावी भाजी विक्रेत्यांचे गाळे बंद स्थितीत आहेत. भाजी मार्केटच्या मागच्या बाजूस पेण नगरपालिकेने काही अवचित प्रकार घडू नये म्हणून गर्जा रायगडच्या तक्रारीमुळे लॉक लावण्यात आला होता. परंतू भाजी मार्केट केव्हा सुरु होईल या बातमी साठी फोटो घेण्यासाठी गर्जा रायगडचे संपादक संतोष मंदा लक्ष्मण पाटील हे आपली सहकारी मुस्कान खान यांच्या समवेत भाजी मार्केटमध्ये गेले असता एक विदारक सत्य समोर आले ते म्हणजे नगरपालिकेने लावलेला लॉक उघडया स्थितीमध्ये आढळला. हा लॉक उघडा कसा काय याबाबत माहिती घेतली असता शेजारी असलेल्या वडापाववाल्या जवळ चावी असल्याचे समजले. त्याला विचारणा केली असता त्याने सांगितले की, इडलीवाल्याजवळ देखील चावी असल्याचे सांगितले. महत्वाची बाब म्हणजे नगरपालिकेने लावलेल्या लॉकची चावी नगरपालिकेच्या कर्मचार्यांव्यतिरिक्त इतर व्यक्तींकडे गेलीच कशी? या विषयी माहिती घेतल्यानंतर कुंपणचं शेत खातयं असल्याचे समोर आले. त्यानंतर गर्जा रायगडच्या संपादकांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांशी संपर्क करुन सर्व प्रकार सांगितला. त्यांनी तातडीने अधिकारी पाठवून देतो असे सांगून कार्यालयीन प्रमुख गणेश सिंग ठाकूर आणि आरोग्य निरीक्षक दयानंद गावंड यांना पाठविले त्यांनी देखील याबाबत ज्यांच्याकडे चावी होती त्यांच्याकडे विचारणा केली तेव्हा देखील इडली विक्रेते इसम यांनी नगरपालिकेच्या एक कर्मचार्याने डुबलीकडे चावी दिल्याचे कबूल केले. तसेच या भाजी मार्केटमध्ये सरकारमान्य ऑनलाईन लोटोचे दुकान असून, त्याचे मालक शिंदे यांना लायन्सन बद्दल विचारणा केली असता पोलीस स्टेशनमध्ये दिले आहे असे सांगितले त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे कागदपत्र उपलब्ध झाले नाही. तसेच आतमध्ये असणार्या पानपट्टीवर अक्षेपार्ह वस्तू विक्री साठी ठेवल्याचे आढळून आले. या सर्व बाबींवर नगरपालिका कार्यालयीन प्रमूख गणेश सिंग ठाकूर यांनी पोलीसात रितसर तक्रार करुन दोषींवर कारवाई करणार असल्याचे गर्जा रायगडशी बोलताना सांगितले.
