पेण ः प्रतिनिधी
आंदोलन सम्राट अशी अवघ्या महाराष्ट्राला धैर्यशील पाटील यांची ओळख आहे. गेल्याच ऑगस्ट महिन्यात भाजपकडून धैर्यशील पाटील यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठवण्यात आले. बॅरिस्टर ए .आर. अंतुले नंतर रायगडकरांना मिळालेला हा राज्यसभेवर पहिलाच मान आहे. धैर्यशील पाटील यांच्या स्नेहसागर बंगल्यावर मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांच्या हजेरीत साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला देशाचे उपराष्ट्रपती सन्माननीय श्री जगदीप धनखड यांनी संसदेत आपल्या खास शैलीत धैर्यशील पाटील यांना त्यांच्या कार्याचा गैरव करत शुभेच्छा दिल्या. तर सायंकाळी सहा वाजल्यापासून धैर्यशील पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांच्या झुंडीच्या झुंडी वाक्रुळ येथील त्यांच्या निवासस्थानी येत होत्या.
धैर्यशील पाटील यांच्या मातोश्री, दोन बहिणी आणि पत्नी, मुली यांनी धैर्यशील पाटील यांना ओवाळून त्यांचे औक्षण केले. तसेच पेण तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हजर होते.
