पेणःप्रतिनिधी
हमरापुर गावातील स्वयंमघोषीत पुढारी विश्र्वास नामदेव पाटील याने भाजपचे अनुसुचित जाती सेलचे तालुका अध्यक्ष मयुर विजय सुर्वे यांच्यावर हल्ला करून मारहाण केली. तसेच जातीवाचक शिवीगाळ करून पोटात लाथा बुक्के मारल्या. याविषयी सविस्तर वृत्त असे की,
दिनांक 04/04/2025 रोजी 11ः00 वाजता जेएसडब्ल्यु कंपनीचे अलिबाग गेटजवळील ब्रिजखालील पीआर ऑङ्गिसच्या कॉन्फरंन्स हॉलमध्ये मिटींगकरीता जेएसडब्ल्यू कंपनीचे आत्माराम बेटकेकर यांनी बोलविले होते. त्याप्रमाणे हमरापूर ग्रामपंचायतीचे सरपंच राकेश चंद्रकांत दाभाडे, उपसरपंच रविंद्र कृष्णा शेदवळ, सदस्य संजय विजय पाटील, ओमकार चंद्रकांत पाटील, युवराज सुरदास म्हात्रे, तसेच गावकरी संदेश हरीश्र्चंद्र कदम, विनोद शंकर नाईक, दिनेश नामदेव पाटील, दिनेश मारुती पाटील व इतर ग्रामस्थ असे कंपनीत गेले होते. त्या दरम्यान मिटींग सुरु झाली मिटींग संपली असताना मयुर याने 5 वर्षापूर्वी मयुर याची जमीन कंपनी घेणार होती. परंतू, कंपनीने आजतागायत मयुर याची जमिन का घेतली नाही याविषयी मयुर विचारणा करायला गेला असता यातील स्वयंघोषित पुढारी विश्र्वास याने मयुरला त्याचे म्हणणे मांडण्यापासून थांबविले आणि शिवीगाळ सुरु केली. तसेच तु बाहेर आल्यावर तुला बघतो अशी धमकी देउन विश्र्वास बाहेर आला आणि त्यानंतर मयुर बाहेर आल्यावर त्याच्या कानाखाली मारली तसेच लाथा बुक्क्याने मयुर ला मारहाण करुन जातीवाचक देखील शिवीगाळ केली. तेव्हा हमरापूर सरपंच राकेश दाभाडे हे मध्यस्थी आले आणि विश्र्वास ला थांबवले अन्यथा काही विपरीत घडले असते तर हा हल्ला मयुरच्या जिवावर देखील बेतला असता. या बाबत वडखळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता बी एन एस 2023 115(2), 352, 351 (2), 351(3), अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 1(1)(आर), 3(1)(एस), ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून या गुन्हयाचा अधिक तपास विभागीय उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे हे करत आहेत. महत्वाची बाब म्हणजे मयुर याला मारहाण गावचे प्रथम नागरिक यांच्या समोर तसेच ग्रामपंचायत सदस्यांसमोर झाली ही बाब खुपच दुर्दैवी आहे. तसेच आज महायूतीच्या शासनामध्ये त्यांचे पदाधिकारीच सुरक्षित नाहीत तर हे जनतेला न्याय काय देतील?
