वैकुंठ पाटील यांचे कबड्डी क्षेत्रात यशस्वी पदार्पण
पेणः प्रतिनिधी
रायगड कबड्डी लिग 2025 चे पहिल्यांदाच आयोजन रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन मार्फत महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे मा.सहकार्यवाहक ऍड.अस्वाद पाटील आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्यवाहिक चित्रा अस्वाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कबड्डी लिगचे आयेाजन करण्यात आले होते. या लिगमध्ये एकूण आठ संघ सहभागी झाले होते. पेण वॉरियर्स, अवास वायफर्स, एमडी वॉरियस, समिरा चावास, व्हिजी टायगरर्स, एबी सुपर प्लेयर्स, एस बी फायटर्स, ओपी इगलर्स, चार दिवस चाललेल्या या लिग मध्ये वैकुंठ पाटील यांच्या पेण वॉरियर्सचा दबदबा पहिल्या दिवसा पासूनच होता. सात मॅचेस पैकी पाच विजयी तर एक टाय आणि एक पराजय यासह 29 पॉईंड मिळवून गुणतालीकेत पहिल्या नंबरला होते. तर अवास वायफर्स सात पैकी पाच विजय मिळवून गुणतालीकेत दुसर्या नंबरला होते. या स्पर्धेचा अंतिम सामना पेण वॉरियर्स आणि अवास वायपर्स यांच्यामध्ये अतितटीचा झाला. शेवटच्या 30 सेकंद मध्ये निर्णय लागला. शेवटच्या चढाईच्या वेळेला पेण वॉरियर्सकडे 23 गुण तर अवास वायफर्स 24 गुण 1 गुणाची आघाडी अवास वायफर्सकडे होती परंतु आयकॉन प्लेयर आकाश गायकवाड याने सहा गुणांची चढाई मारून पहिल्या वहिल्या रायगड कबड्डी लिगचे विजेते पद वैकुंठशेठ पाटील यांच्या पेण वॉरियर्स यांना मिळवून दिले.
या स्पर्धेसाठी खा.सुनिल तटकरे, खा.धैर्यशील पाटील, मा.मंत्री रविंद्र चव्हाण, आ.प्रशांत ठाकूर, आ.महेंद्र दळवी, यांच्यासह क्रिडा क्षेत्रात अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव, राजा भौसाल, माया आक्रे, तर शिव छत्रपती पुरस्कार विजेत्या छाया देसाई, गणेश शेट्टी, मिताली जाधव आदींसह रायगड जिल्हयातील सर्व शिव छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू उपस्थित होते. या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ठ खेळाडू आकाश गायकवाड पेण वॉरियर्स, सर्वोत्कृष्ठ चढाई राज आचार्य अवास वायफर्स, सर्वोत्कृष्ठ पकड अभिषेक भोईर अवास वायङ्गर्स, यांना विशेष पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले. कबड्डी क्षेत्रात वैकुंठ पाटील यांची यशस्वी पदार्पण झाल्याचे समस्त प्रेक्षकांकडून बोलले जात होते. कारण वैकुंठ पाटील यांनी क्रिकेट स्पर्धांचे मोठमोठाले आयेाजन करून क्रिकेटला संजिवनी देण्याचे काम केले होते. परंतु रायगड जिल्हा अजिंक्य पदाची चाचणी घेउन त्यांनी कबड्डी क्षेत्रात पाउल ठेवले होते आणि पहिल्यांच रायगड कबड्डी लिगमध्ये विजेते पद मिळवून यशस्वी पदार्पण केले.
