पेणः प्रतिनिधी
बापूसाहेब नेने फाउंडेशन व सोबती संघटना पेण मार्ङ्गत ज्येष्ठ समाजसेविका शुभांगी नेने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी बापूसाहेब नेने फाउंडेशन तर्फे पाच शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार दिला जातो. तर सोबती संघटनेमार्फत विविध क्षेत्रात काम करणार्या पाच मान्यवरांना देखील सोबती आदर्श व्यक्तीमत्व पुरस्कार देउन सन्मान केले जाते. यावर्षी बापूसाहेब नेने फाउंडेशन तर्ङ्गे आदर्श शिक्षक म्हणून सौ.मानसी मच्छींद्र केदारे शाळा वावोशी, श्रीमती मनिषा अमृत दळ्वी शाळा डोलवी, सौ. सरिता सुधाकर सावंत आश्रमशाळा वावळोली सुधागड, सौ. सिमा रूपेश पाटील अंगणवाडी शाळा वडखळ, श्री. किशोर पाडुरंग पाटील शाळा अंबिवली अदिंचा समावेश होता. तर सोबती संघटनेमार्फत सामाजिक क्षेत्रात काम करणारे पोलिस निरीक्षक वडखळ प्रसाद दशरथ पांढरे, कला क्षेत्रात काम करणारे राजेंद्रनाथ मारूती जोशी, क्रिडा क्षेत्रात काम करणारी ऋणाली प्रदिप मोकल, वैद्यकिय क्षेत्रात काम करणार्या डॉ. सोनाली मनिष वनगे, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे गुरुकुल शिक्षण संस्था वडखळ अदींना पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरुप सन्माचिन्ह, शाल, श्रीङ्गळ तसेच रोखरक्कम अडीच हजार रुपये असा होता. हा पुरस्कार सोहळा 14 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी भाऊ साहेब नेने महाविदयालयाच्या सांस्कृतिक ओपन हॉलमध्ये प्रमुख अतिथी राधीकाताई घोरफडे पुणे, ज्येष्ठ समाजसेवक बापूसाहेब नेने व ज्येष्ठ समाजसेविका शुभांगी नेने यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
पुरस्कार सोहळया अगोदर ज्येष्ठ समाजसेविका शुभांगी नेने यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांचे औक्षण करुन त्यांची ओटी भरुन व केक कापून साजरा करण्यात आला यावेळी दोन्ही संस्थांचे अध्यक्ष ऍड. मंगेश नेने यांनी प्रास्ताविक केले. तर पुरस्कार विजेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथी राधीकाताई घोरफडे यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले. त्याप्रमाणे ज्येष्ठ समाजसेवक बापुसाहेब नेने यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. मंगेश नेने यांनी केले. आणि पसायदानाने पुरस्कार सोहळयाची सांगता झाली.
