वरवणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी तुकाराम गायकर

Uncategorized

पेण ः प्रतिनिधी
स्व.मा.मंत्री मोहनभाई पाटील, खासदार धैर्यशील पाटील यांच्या वरवणे ग्रामपंचायतीमध्ये आज उपसरपंच पदाची निवडणुक झाली. यामध्ये तुकाराम गोपाळ गायकर हे बिनविरोध निवडुन आले आहेत.
पूर्व विभागातील प्रतिष्ठेची समजली जाणारी ग्रामपंचायत म्हणजे वरवणे ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची मुदत संपल्याने नव्याने झालेल्या निवडणुक कार्यक्रमामध्ये तुकाराम गायकर यांचा एकच उमेदवारी अर्ज आल्याने निवडणुक अधिकारी तथा सरपंच देहू वाघमारे यांनी तुकाराम गायकर यांना उपसरपंच म्हणून घोषित केले. यावेळी तुकाराम गायकर यांचे अभिनंदन करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती के.डी. म्हात्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महादू मानकर, नगरसेवक संतोष पाटील, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे, भाजप युवा मोर्चा जिल्हा सदस्य विवेक म्हात्रे यांच्यासह मोठया संख्येने वरवणे झापडी येथील तरुण वर्ग उपस्थित होता.