पेण ः प्रतिनिधी
शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील राज्यस्तरीय उपक्रमशील संस्था मुंबई तर्ङ्गे दिला जाणारा अष्टपैलू साहित्य भूषण राज्यस्तरीय पुरस्कार यंदा सौ. स्मिता गणेश पाटील यांना मिळाला आहे. स्मिता पाटील या भारतीय साहित्यिक व सांस्कृतिक मंच तथा फ्रीडम स्टोरी ऑफ इंडिया जिल्हा रायगड मध्ये चार वर्ष रायगड जिल्हाध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. त्यासोबत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून त्या उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. साहित्यिक कार्यासोबत त्यांचे सामाजिक, शैक्षणिक कार्यही खूप उल्लेखनीय आहे. त्यांच्या या कार्यातील योगदान बघून त्यांना आत्तापर्यंत राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार, सावित्रीबाई फूले आदर्श शिक्षिका पुरस्कार, ग्लोबल महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार, राष्ट्रपिता महात्मा फूले समाजभूषण पुरस्कार, अष्टपैलू काव्य भूषण पुरस्कार, जागतिक संसद आंतरराष्ट्रीय पुरस्कार, कोविड योध्दा पुरस्कार इ. असे पुरस्कार मिळाले आहेत.
अक्षरमंच काव्य समूहात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांनी सलग तीन वर्ष सहभाग घेउन उत्तम कविता सादर केल्या. त्यांच्या साहित्य कलेच्या सन्मानार्थ त्यांना अष्टपैलू साहित्य भूषण हा राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आलेला असून संस्थेच्या या गौरव पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
