आपण जनसामान्यांना उपयोगी पडलो तर जनसामान्य आपल्याला उपयोगी पडतातःऍड.निलीमा पाटील

Uncategorized

पेणःप्रतिनिधी
शिवोहं प्रतिष्ठानच्या विद्यमाने युवा नेते भुषण कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 18 वर्षा वरील पुरूष व महिलांकरीता मोफत कर्करोग तपासणी व जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी रा.जि.प.अध्यक्षा ऍड.निलिमा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की भुषणभाईंने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करून जनसामान्यांच्या आरोग्याचा विचार केला आहे. आज वाढदिवस म्हटल्यानंतर केक कापणे, मटणाचे जेवण करणे, रात्रीचा नाच मौज मजा करणे असे प्रकार करत असतात. परंतु आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आरोग्य तपासणीचा विचार करणे हे ही कौतुकाचे आहे. आपण जनसामान्यांना उपयोगी पडल्यास जनसामान्य आपल्याला उपयोगी पडतात आणि भविष्यात भुषण भाई नक्कीच हे जनसामान्य आपल्याला जेव्हा त्यांची गरज आपल्याला भासेल तेव्हा ते उपयोगी पडल्याशिवाय राहणार नाहीत. आज आपण या कर्करोग तपासणी बरोबर हिंदू भुषण दिनदर्शीकेचे अनावरण व लोकार्पण केलेत हे देखील कौतुकास्पद आहे. शेवटी निलिमा पाटील यांनी भूषण कडू यांना वाढदिवसाच्या व पुढच्या कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्यासपिठावर भूषण कडू यांचे आईवडील, नगरसेवक प्रकाश पाटील, नगरसेवक संतोष पाटील, संजय म्हात्रे, पत्रकार विजय मोकल, पत्रकार अनिस मनियार, डॉ.भारती प्रितम भोईर, डॉ.सोनाली तेलंगे, भूषण कडू यांची पत्नी अश्विनी कडू अदी मान्यवर उपस्थित होते. तर या शिबिराला मा.सभापती राजा म्हात्रे, उदयोजक प्रभाकर पाटील, कमर्शियल ज्येष्ठ आट्रीस्ट योगेश निखारे, सुप्रध्दि विधी तज्ञ नितीन पाटील, युवा नेते महेश पाटील, उदयोजक जयेश पाटील, आंबेघर मा.सरपंच प्रमोद लंबाडे, उदयोजक राजन पाटील अदींनी सदिच्छा भेट दिली. या शिबिरात एकूण 75 हून जास्त लाभार्थ्यांनी लाभ घेतला तर या शिबीरासाठी कर्करोग प्रतिबंध विभाग खोपोली, टाटा मेमोरियल सेंटर मुंबई यांनी सर्वस्वी मदत केली. तर शिवोहं प्रतिष्ठानच व भूषण कडू यांचे हितचिंतक अजित जाधव,राजेंद्र पाटील, रोमी धुसिया,लखन शिंदे,रोहन दळवी,किशोर माळी, दिनेश विभुत, तुषार माळी, अदींनी मेहनत घेतली.