पेण
पेण

पेन शहरातील फणसडोंगरी येथे राहणाऱ्या गणेश बाळू चुणारे वय – १४ या या अल्पवयीन मुलाची हत्या केल्याची घटना घडली आहे.
याबाबत फिर्यादी बाळू सीताराम चुणारे वय – ५५ रा. फणसडोंगरी (अंबिका नगर) पेण यांचा मुलगा गणेश चुणारे वय १४ याची चुनारे याची १० जानेवारी रात्री च्या सुमारास अज्ञात आरोपीने हत्या करून त्याचा मृतदेह आंबेडकर शाळा येथील झुडपात टाकून दिला होता.
याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा रजि. ९/२०२५ कलम १०३ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल हे करीत आहेत. यावेळी घटनास्थळी रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.