पेणःप्रतिनिधी
पेण फणसडोंगरी परिसरात अनेक वेळा पोलीससांकडून गांजा, चरस विकणार्यांविरूध्द कारवाई झालेली आहे. मात्र आजही या परिसरात अमली पदार्थ विकले जात आहेत. त्यामुळेच फणस डोंगरी व पिर डोंगरी परिसरात अनेक अल्पवयीन मुल व्यसनाधिन झालेले पहायला मिळतात. गांजा, चरस, एमडी, या पदार्थां बरोबर आता अल्पवयीन मुल नेलपेंट, रिम्युव्हर, आयोडेक्स, पंचरचे सोल्यूशन, पेंट, ग्लू, ड्रायक्लिनिंगचे केमिकल, बॉण्ड, स्टिकफास्ट, फेविक्विक, गॅसोलिन, हेअरस्प्रे, डिओड्रंट, थिनर, पर्मनंट मार्कर अदी पदार्थांमध्ये अल्पवयीन मुल अडकल्याचे चित्र दिसत असून एक प्रकारे येणारी पिढी पालकांच्या बेजबाबदारपणामुळे वाया जाण्याच्या मार्गावर आहे. याचेच जिवंत उदाहरण म्हणजे पेण कासार तळा साई मंदिर शेजारी 11 जानेवारी रोजी झालेली हत्या होय.
पेण शहर ज्या प्रकारे झपाटयाने वाढत आहे त्या प्रकारे अनैतिक व अवैध्य धंदयांना देखील उधान आलेले पहायला मिळते. त्यातच पोलीस खात्याजवळ असलेले कमीचे मनुष्यबळ. यामुळे अवैध्य धंदे रोखण्यास पोलीस यंत्रणेला हात अपुरे पडत आहेत. फणस डोंगरी परिसरात स्थलांतरीत झालेल्या लोकांचे मोठया प्रमाणात नागरीकरण झाले आहे. परप्रांतीयांचा लोंढा देखील वाढल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळेच अमली पदार्थ देखील सहज डोंगरी परिसरात उपलब्ध होत आहे. गणेश चुणारे यांची जी हत्या आहे ती अशातूनच झाल्याचे अवघ्या चार तासात पोलीस यंत्रणेने उघटकीस आणले. या बाबत पोलीस यंत्रणेचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. सदरील घटनेचे सविस्तर वृत्त असे की, बाण्ॅड (सोल्यूशन) या व्यसनात धुर्त होउन अनिरूध्द कदम वय 15 वर्षे याने गणेश चुणारे वय 14 वर्षे या वर लाकडी राप्टरच्या सहाय्याने वार करून ङ्गरार झाला होता. मात्र पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संदीप बागूल यांनी तातडीने घटनास्थळी पोहचून तपास यंत्रण सज्ज केली. फॉरेंसिक व्हॅन व श्वान पथकास पाचारण करून प्राथमिक तपास करण्यात आला. घटनास्थळावरील परिस्थिती जन्य पुराव्याचे आधारे व मयताचे संगतीत असणारे मित्र यांचा शोध घेउन सीसीटीव्ही च्या आधारे आरोपीचा शोध घेउन त्यास ताब्यात घेतले आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्यास कर्जत येथील कारागृहात ठेवण्यात आले आहे.
या गुन्हयाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पेण गजानन टोंम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पेण पोलीस ठाणे संदीप बागुल हे करीत आहेत. कार्यान्वित केलेल्या विशेष पथकामध्ये शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज संकलन, फुटेज चेक, नाकेबंदी, आरोपीचे शोध, पंचनामा व पुरावे हस्तगत याप्रमाणे सपोनि निलेश राजपूत, मसपोनि अस्मिता पाटील, पोउपनि समद बेग, पोउपनि प्रतीक पोकळे, पोउपनि विक्रम नवरखेडे, सफौ भाग्यवान कांबळे, सफौ राजेश पाटील, पोहवा प्रकाश कोकरे, राजेंद्र भोनकर, संतोष जाधव, सागर खांडसकर, अजिंक्य म्हात्रे, सचिन व्हस्कोटी, सुशांत भोईर, पोना अमोल म्हात्रे, पोकॉ गोविंद तलवारे, संदिप शिंगाडे, अशांत सांगविकर अदींच्या समन्वयातून अवघ्या चार तासात आरोपीला गजाआड केले आहे.
