पेण:प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे द.रायगड जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांबेकर यांच्या वाढदिवस निमित्त ठेवण्यात आलेल्या जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचा शिवशंभो पाटणेश्वर संघ मानकरी ठरला आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 64 संघानी सहभाग घेतला होता. सदरील स्पर्धेचे उद्घाटन राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला.
रोहा तालुक्यातील आमडोशी येथे झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक- शिवशंभो पाटणेश्वर संघ यांना 25,555/- व आकर्षक चषक, व्दितीय क्रमांक-चौडेश्वरी, कडसुरे संघ यांना 15,555/- व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक- नवतरुण, धाटाव संघ यांना 11,111/- व आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांक- वायुसुत, ओढांगी संघ यांना 11,1110/- व आकर्षक चषक तसेच उत्कृष्ट खेळाडू – संजोग पाटील, पाटणेश्वर, उत्कृष्ट चढाई- निखिल शिर्के, कडसुरे, उत्कृष्ट पक्कड प्रतिक रटाटे, धाटाव व पब्लिक हिरो-मंदार पाटील, ओढांगी यांनाही वैयक्तिक बक्षीसे देऊन जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील व द.रायगड जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांबेकर यांच्या शुभहस्ते देऊन गौरविण्यात आले.
यावेळी उ.रा.जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा व श्रेया कुंटे, द.रायगड जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांबेकर तालुका सरचिटणीस आनंद लाड, राष्ट्र.कॉ.रा.जि. उपाध्यक्ष उदय जवके, राष्ट्र कॉ. नागोठणे विभागीय अध्यक्ष संतोष कोळी यांच्यासह राकेश शिंदे, पंकज जवके, राजेंद्र कामथे तसेच नागोठणे कबड्डी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व कबड्डी प्रेमी उपस्थित होते.
यावेळी दीपक जावेकर, प्रमोद धुळे, सुबोध गोळे, निवृत्ती जांभेकर, राजेंद्र शिर्के, अनंता कामथे, प्रमोद जांबेकर, अमित जांबेकर, हरेश भोसले, संजय गोळे यांच्यासह नागोठणे कबड्डी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व कबड्डी प्रेमी उपस्थित होते.
