गर्जा रायगड रत्न पुरस्काराची घोषणा

Raigad

पेण:प्रतिनिधी
सालाबाद प्रमाणे या वर्षी ही साप्ताहिक गर्जा रायगडच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त गर्जा रायगड रत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून यंदाच्या गर्जा रायगड रत्नांचे मानकरी ठरले आहेत. कु. सिध्दार्थ संजिवन म्हात्रे (उरण), सौ.अवनि पाटील (नवि मुंबई), डॉ.विनायक पवार (पेण), राजेंद्र जोशी (पेण), चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया (सी.एफ .आय.पेण), अग्निशामक दल (पेण), तर विशेष पुरस्कार गोपी रा. पाटील (निवृत्त पोलीस निरिक्षक) यांचा समावेश आहे.
गर्जा रायगड रत्न पुरस्कार सोहळा महाकाली हॉल कासार आळी पेण येथे 9 फेब्रुवारी2025 रोजी सकाळी 10ः00 वाजता संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार धैयशील पाटील तर प्रमुख अतिथी सौ.रुची मंदार म्हात्रे सह दिवानी न्यायाधीश कनिष्ठ विभाग व न्यायदंडाधीकारी प्रथमवर्ग ठाणे व अनिरूध्द पाटील युवा शास्त्रज्ञ तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतीक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती गर्जा रायगड चे संपादक संतोष मंदा लक्ष्मण पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली.