सभापती पदी महादू मानकर यांची निवड

Political

पेण ः प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जयप्रभा म्हात्रे यांनी सभापती पदाचा राजिनामा दिल्याने रिक्त झालेल्या सभापती पदाची आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी बिनविरोध महादू मानकर यांची निवड झाली.
महादू मानकर हे स्वर्गीय मोहन भाई पाटील यांचे एक विश्र्वासू सहकारी म्हणून तालुक्यात ओळखले जात आहेत. गेली पंधरा वर्ष महादू मानकर हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून काम पाहत असून, काही काळ त्यांनी खरेदी विक्री संघाचे संचालक म्हणून देखील  काम पाहिले आहे. त्यांच्या या प्रदिर्घ अनुभवाचा फायदा कृषी उत्पन्न बाजार समितीला होईल. असे जाणकारांचे मत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती पदी निवडणुक असल्याने सकाळपासूनच भाजप पार्टी कार्यालयात कार्यकर्त्यांची रेलचेल होती. कोण सभापती होईल याबाबत शेवटपर्यंत गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते. उमेदवारी अर्ज भरण्याच्या 5 मिनीट अगोदरच महादू मानकर यांचे नाव पुढील एक वर्षासाठी खासदार धैर्यशील पाटील यांनी जाहीर केले. तर त्याच्या पुढील एक वर्षासाठी हरिश्र्चंद्र पाटील हे सभापती असतील असे ही यावेळी जाहीर करण्यात आले. दोन वाजता सभापती पदाची नियुक्ती जाहीर केल्यानंतर खासदार धैर्यशील पाटील यांनी पुष्पगुच्छ देउन नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन केले. तर मावळते सभापती जयप्रभा यांनी देखील पुष्पगुच्छ देउन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी जि.प.सदस्य प्रभाकर म्हात्रे (हरी ओम), जि.प.सदस्य डी.बी.पाटील, यांच्यासह मोठयाप्रमाणात भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.