पोलीसांच्या कामगिरीला सलाम

Crime

48 तासात गुन्हेगार गजाआड

पेणःप्रतिनिधी
दर वेळेला कोणताही गुन्हा झाला तर या ना त्या कारणास्तव पोलीसांना दोष दिला जातो. पोलीस ही माणस आहेत याचा विसर समाजाला पडतो. मात्र ज्या वेळेला पोलीस एखादा गुन्हा उघडकीस आणून गुन्हेगाराचा पर्दाफाश करतात त्या वेळेला पोलीसांना दोष देणारी मंडळी पोलीसांच्या कामगीरीला दाद दयायला मात्र कंजुसगिरी करतात. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संदीप बागूल यांच्या नेतृत्वाखाली अनेक गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांचा पर्दाफाश केला आहे. असाच प्रकार दोन दिवसा पूर्वी झालेल्या पेट्रोल बॉम्ब हल्ल्याच्या गुन्हयाबाबत झाला आहे.
दिनांक 01/02/2025 ते 02/02/2025 रोजी मौजे पेण शहरातील पेण शिक्षण महीला समीतीचे, इंग्लिश मिडीअम स्कुल, पेण (गुरुकुल शाळा) मधील इयत्ता 9 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विध्यार्थी यांचे, त्याच शाळेतील मैदानावर स्काउट गाईड कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. त्या करीता शाळेच्या मैदानावर तात्पुरते सहा टेंट (तंबु) उभारण्यात आले होते. दिनांक 01/02/2025 रोजी कॅम्पचे सर्व कार्यक्रम पुर्ण झाल्यानंतर रात्री दिनांक 02/02/2025 रोजी 01-00 वाजण्याचे सुमारास सर्व विद्यार्थी, शिक्षक व स्टाफ गुरुकुल शाळेच्या वर्ग खोल्यांमध्ये झोपण्यास गेले होते. गुरुकुल शाळेचे वॉचमन यांना 04.00 वाजण्याच्या सुमारास ग्राउंड वर काहीतरी जळत असल्याचे दिसून आल्याने ती माहिती शिक्षक स्टाफ यांना दिली. आगीमध्ये सहा तंबूपैकी एक तंबू पूर्णतः जळून खाक झालेला होता. सदर घटनेची माहिती मिळताच पेण पोलीस ठाण्यात अकस्मित अग्नी र.जी. 01/2025 दाखल करण्यात आला आहे. सदर अग्नीच्या चौकशीवरून पेण पोलीस ठाण्यात CR No 17/2025 BNS 324(3), 324(6), 326 (f) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास समदे बेग व गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अंमलदार करीत आहेत.
सदरचा गुन्हा हा शाळेच्या आवारात स्काउट गाईडच्या शिबीरावेळी घडलेला असल्याने विद्यार्थ्याच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने त्याची गंभीर दखल घेउन मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, यांनी गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन गुन्हयाचे घटनास्थळी भेट देउन तपासकामी मार्गदर्शन केले. तसेच अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे व उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांनी सक्त सुचना दिल्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी पेण पोलीस ठाणेकडील वेगवेगळे एकुण 3 पथके तयार करुन सदर गुन्हयाचे तपासात काहीएक सुगावा नसताना, सदरचा गुन्हा कोणत्या हेतुने घडला आहे याबाबत कसलीही माहिती नसताना, पेण पोलीस ठाणेकडील पथकाने घटनास्थळावरील, घटनास्थळाच्या मार्गावरील सुमारे 55 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, परंतु सदर आरोपी याने गुन्हा करणेकरीता छुप्या रस्त्याचा वापर केला असल्याने सदर आरोपीत याची साखळी जुळुन येत नव्हती ती साखळी जुळवुन आणली व गुन्हयातील साक्षीदारांची पडताळणी करुन, गोपनीय तसेच्च तांत्रिक माहितीचे आधारे अथक प्रयत्न करून कौशल्यपूर्वक तपासाचे आधारे 48 तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणलेला आहे व सदर गुन्ह्यातील आरोपीत समीर नरदास पाटील रा. वढाव तालुका पेण जिल्हा रायगड हा असल्याचे निष्पन्न करुन त्यास गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आले असून सदरील गुन्हयातील आरोपी यास न्यायालयात हजर केले असता त्याला 11 फेबु्रवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील कायदेशीर कारवाई चालु आहे.
पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या सूचनांप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे PSI समद बेग, राजेश पाटील, पोहवा/885 सचिन व्हस्कोटी, पोहवा/1568 अजिंक्य म्हात्रे, पोहवा/873 संतोष जाधव, पोहवा/861 प्रकाश कोकरे, पोहवा /2319 अमोल म्हात्रे, पोहवा/1424 सुशांत भोईर, पोशि 1951 गोविंद तलवारे यांनी केलेली आहे. त्यांच्या या कामगिरी बाबत पेण शहरात सर्वत्र कौतुक केले जात आहे.