पेणःप्रतिनिधी
पेण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आज दिवसभर जय शिवराय जय जिजाउ नाद घोषाणे आसमांत दुमदुमला होता. पेण नगरपालिकेडून शासकीय शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराज चौकात साजरी करण्यात आली. पेण नगरपालिकेच्या कार्यालयापासून कर्मचारी अधिकारी वर्गाने तसेच लोकप्रतिनिधींनी एकत्रीतपणे रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमध्ये कर्मचारी, आणि लोकप्रतिनिधी मोठया उत्साहात शामील झाले होते. यामध्ये आमदार रविशेठ पाटील, माजी नगराध्यक्ष रघुनाथ बोरेकर, माजी नगराध्यक्षा प्रितम पाटील, माजी सभापती शेहनाज मुजावर, माजी नगरसेविका प्रतिभा जाधव, माजी नगरसेवक पांडुरंग जाधव, माजी नगरसेवक संतोष पाटील, जनार्दन जाधव, अजय शिरसागर, यांच्या सोबत पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संदीप बागुल, मुख्याधिकारी जिवन पाटील, पेण नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी अदींचा समावेश होता. त्यानंतर स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते महाराजांच्या अर्ध पुतळयाचे पुजन करून पुष्पहार घालण्यात आले. यावेळी विद्यार्थी वाहतुक संघटने मार्फत बॅरिस्टर एटी पाटील चौकातुन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मर्दानी खेळांचे आयेाजन देखील याच संघटनेच्या पदाधिकार्यांकडून करण्यात आले होते.
तर आज दिवस भरात अनेक शिवप्रेमी तरुणांच्या महाराजांच्या वेगवेगळया गडांवरून शिवज्योतीसह तरुण वर्ग महाराजांना मानवंदना करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात येत होते. आज पुर्ण शहरात शिवमय वातावरण पहायला मिळाला.
तर ग्रामीण भागामध्ये देखील मोठया प्रमाणात शिव जयंती गावागावात साजरी करण्यात आली. तसेच पेण एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र शिक्षण संस्था, महिला शिक्षण संस्था पेण, नगरपालिका शाळा यांच्या मध्ये देखील शिवजयंती मोठया उत्साहात साजरी केली.
