पेण ः प्रतिनिधी
पेण पोलीस ठाणे हद्दीत काश्मिरे गावात घरफोडीचे गुन्हे सतत घडत आहेत. पोलीस अधीक्षक अभिजीत शिवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास करत असताना काश्मिरे-कांदळेपाडा येथील फिर्यादी संगिता खंडू पाटील (44) या शेतावर गेल्या असता अज्ञात चोराने बाथरुमची खिडकी फोडून घरात शिरुन 3 लाख 74 हजार 300 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोराच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून त्याला पेण येथील न्यायालयात हजर करण्यात आले.
हरिश्र्चंद्रउर्फ गुड्डू बाळकृष्ण म्हात्रे असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी आरोपीकडून 45 हजार रुपये किंमतीची 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन जप्त केली आहे. संबंधित प्रकरणाच्या तपासाबाबत या अट्टल चोराने अधिक गुन्हे केले असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे