पेण ः प्रतिनिधी
पेण वढाव तालुका पेण येथील निवृत्त प्राथमिक शिक्षक देविदास गणपत म्हात्रे वढाव यांना नेताजी पालकर मंडळ चौक खालापूर येथील उंबरखिंड विजयदिन निमित्ताने शिवशाहीतील ऐतिहासिक स्थळ चौक व उंबरखिंड आणि त्या परिसरातील महत्व या विषयावरील जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळाला आहे. प्रथम क्रमांक श्रीमती शुभांगी नंदकुमार साखरे तर द्वितीय क्रमांक सौ. सुहासनी सुनिल पवार यांना मिळाला आहे. हि ऐतिहासिक क्षणाची निबंध स्पर्धा रायगड भुषण यशवंत सकपाळ चौक व भुषण पिंगळे कर्जत यांनी भरवली होती. ते आजतागायत 56 वर्षे हि स्पर्धा भरवत आहेत. या स्पर्धेचे परीक्षक इतिहास अभ्यासक प्राध्यापक अशोक मोरे शिरवली खालापूर हे होते.
देविदास म्हात्रे हे निवृत्त प्राथमिक शिक्षक असून त्यांना जिल्हास्तरावरील निबंध स्पर्धेत एकूण आठ पारितोषिके मिळाली आहेत. यातील तीन पारितोषिके नेताजी पालकर मंडळ चौक यांचेकडून मिळाली आहेत. नेताजी पालकर मंडळाने आम्हा सर्व स्पर्धकांना निबंध लिहिण्याची सुवर्णसंधी दिल्याबद्दल या मंडळाचे यशवंत सकपाळ व भूषण पिंगळे तसेच परीक्षक अशोक मोरे या सर्वांना धन्यवाद दिले आहेत.
