पेण ः प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) शाखा रायगडच्या वतीने रविवार दिनांक 5 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता पेण येथील रविराज फार्म हाउस येथे आमदार तथा संस्थापक म.रा.शि.प.(प्राथ.विभाग)संजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार धैर्यशील पाटील, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी खारभुमी योजना मंत्री भरत गोगावले या प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत आदर्श शाळा व आदर्श शिक्षक आणि 2025 दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी आम. रवीशेठ पाटील, आम. महेंद्र दळवी, आम. प्रशांत ठाकुर, आम. महेंद्र थोरवे, आम. विक्रांत पाटील, आम. निरंजन डावखरे, सतिश धारप, संजय निजापकर, पुनिता गुरव, राजेश सुर्वे, सुजित बनगर, संदिप शिंदे, वैभव कांबळे, पुजा शहा, जितेंद्र बोडके अदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यासह रायगड जिल्हयातील सर्व तालुक्याचे अध्यक्ष व पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमामध्ये 2025 दिनदर्शिका व रायगड जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातील आदर्श शाळा व आदर्श शिक्षक यांना पुरस्कार देउन सन्मानित करण्यात येणार आहे.
