पेण ः प्रतिनिधी
पेण येथील डॉ. पंतगराव कदम महाविदयालयाचे प्रध्यापक तथा गीतकार, कवी, अभिनेते डॉ विनायक हाबू पवार यांना ज्येष्ठ हास्य अभिनेते शाहीर दादा कोंडके यांच्या नावाने देण्यात येणारा शाहीर दादा कोंडके स्मृती पुरस्कार गीतकार विभागातून खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते नुकतेच देण्यात आले. आजवर अनेक दिग्गजांना हा पुरस्कार मिळालेला आहे. या वर्षी अभिनय क्षेत्रात स्वप्निल जोशी, दिग्दर्शन क्षेत्रात विजय पाटकर, नविन पदार्पण चेहरा लक्षवेधी चेहरा सुरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, यांना देखील यंदाचा शाहिर दादा कोंडके पुरस्कार मिळाला.
डॉ विनायक पवार हे डॉ.पतंगराव कदम कला व वाणिज्य महाविदयालय येथे मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत. अ.भा.मराठी साहित्य संमेलन 2014 सासवड व अ.भा.सा.स उस्मानाबाद 2019 येथे आमंत्रित कवी म्हणून सहभाग घेतला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता ख्वाडा, बबन, छत्रपती शासन , लॅड 1857, राजकुमार फटवा, रौदल, चौक, टीएमडी, रघु 350 नाद द हार्ड लव या चित्रपटांचे गीतलेखन केले आहे. रौदल चे संवाद लेखन व सरपंचाची भुमिका केली आहे.नाद द हार्ड लव्ह हा चित्रपट 15 नोव्हेंबर 2024 ला रिलीज झाला. त्याची पटकथा, संवाद आणि गाणी लिहिली आहेत. तसेच उस्मान ही भूमिकाही केली आहे.
गीतकार म्हणून आगामी मराठी चित्रपट, चिवटी, ग्लोबल आडगाव, विरजण, गोवर्धन, उत, महाराष्ट्र फाईल्स, कलावती, दुनियादारी 2, येरे येरे पैसा 3, रूबाब ई. या चित्रपटज्ञचे गीत लेखन केले. त्यांच्या गीतकार विभागातील कौतुकास्पद आणि प्रदिर्घ योगदानाबद्दल शाहीर दादा साहेब कोंडके स्मृती गौरव पुरस्कार 1 जून 2025 रोजी रात्री आठ वाजता शाहीर अण्णा साहेब साठे नाटयगृह राणीबाग, भायखळा येथे प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार महाराष्ट्र सांस्कृतिक अभिनय न्यास संयोजनातून दादा कोंडके यांचे नातू ऍड. अनिरुध्द मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आला आहे. डॉ. विनायक पवार यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
