प्रसन्न मोडक यांना पितृशोक

Uncategorized

पेण : प्रतिनिधी

पेण शहरातील सुप्रसिद्ध चिंतामणी कॅटेरर्सचे मालक प्रसन्न मोडक यांचे वडील तथा ज्येष्ठ नागरिक कै. वैजनाथ मोडक (वय ९२) यांचे गुरुवार, दि. ४ जून २०२६ रोजी सकाळी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच पेण शहरासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

कै. वैजनाथ मोडक हे शांत, मनमिळाऊ व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चात मुलगा, नातवंडे, सुना तसेच मोठा परिवार आहे. मोडक कुटुंबीयांचा सामाजिक, व्यावसायिक आणि सांस्कृतिक क्षेत्राशी घनिष्ठ संबंध असल्याने त्यांच्या निधनाने अनेकांनी शोक व्यक्त केला.

कै. वैजनाथ मोडक यांच्या पार्थिवावर पेण येथील श्री विश्वेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, व्यापारी, राजकीय, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर, मित्रपरिवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी कै. वैजनाथ मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत मोडक कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली.

त्यांच्या निधनाने मोडक कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून पेणच्या सामाजिक व व्यापारी क्षेत्रातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना