डॉ. पंतगराव कदम कॉलेजची प्राजक्ता सागवेकर जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत प्रथम

शैक्षणिक

पेण ः प्रतिनिधी
महाराष्ट्र सहकारी संघ पुणे व भाउसाहेब नेने महाविद्यालय पेण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत डॉ पंतगराव कदम महाविद्यालयाची प्राजक्ता सागवेकर या विद्यार्थींनीने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
दि. 13/11/2025 रोजी ही स्पर्धा भाउसाहेब नेने महाविद्यालय पेण येथे पार पडली. स्पर्धेचे उदघाटन प्राचार्य डॉ सदानंद धारप व सहकार कार्यालयाचे राजेंद्र ढवळे यांच्या हस्ते पार पडले. अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. प्राजक्ता सागवेकर या विद्यार्थींनीने सहकार चळवळीतून ग्रामीण विकास या विषयावर भाष्य केले. प्राजक्ताच्या या यशाबद्दल श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष अभय कुमार साळुंखे, सचिव शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मुरलीधर वाघ यांनी तिचे अभिनंदन केले. परीक्षक म्हणून डॉ. बामणे व ढवळे यांनी काम पाहिले. प्राचार्य डॉ विनायक पवार, प्राचार्य डॉ अनिल वळवी, प्राचार्य हिरामण टोंगारे यांचे तिला मार्गदर्शन लाभले.