सभापती स्मिता पाटील तर उपसभापती संजय डंगर
पेणःप्रतिनिधी
गेली साडेतीन वर्ष पेण पंचायत समितीवर प्रशासकीय राजवट होते. मात्र आज पेण पंचायत समितीचा कारभार लोकप्रतिनिधींच्या हाती आले असून, पेण पंचायत समितीवर भाजपची एकहाती सत्ता आली आहे. सकाळच्या सत्रात पक्ष कार्यालयात जिल्हाध्यक्ष तथा खासदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये सभापती म्हणून सव्वा वर्षासाठी मा.जि. परिषद सभापती स्वर्गीय पिंट्याशेठ पाटील यांच्या पत्नी स्मिता पाटील यांना सभापती म्हणून आणि संजय डंगर यांना सव्वा वर्षासाठी उपसभापतीपद म्हणून कार्यभार सांभळण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर सर्व पंचायत समिती सदस्य पेण पंचायत समितीमध्ये जाउन निवडणूक अधिकाऱ्यांकडे सभापती व उपसभापती पदाचे उमेदवारी अर्ज भरले. निवडणूक अधिकारी तथा प्रांतधिकारी प्रविण पवार यांनी इतर कोणाचे ही उमेदवारी अर्ज न आल्याने सभापती म्हणून स्मिता प्रमोद पाटील आणि उपसभापती म्हणून संजय कमलाकर डंगर यांची बिनविरोध घोषणा केली. तद नंतर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांनी सभापती, उपसभापती तसेच सर्व नवनिर्वाचीत सदस्यांना पष्पगच्छ देउन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्षा निलिमा पाटील यांनी सभापती स्मिता पाटील यांना सभापतीच्या खुर्चीमध्ये विराजमान केले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात सभापती व उपसभापती यांना समर्थकांकडून शुभेच्छा देण्यात आले. त्यानंतर उपसभापती संजय डंगर यांना देखील त्यांच्या खुर्ची मध्ये अॅड. निलिमा पाटील यांनी विराजमान केले. त्यानंतर शेवटी खासदार धैर्यशील पाटील यांनी पुष्पगुच्छ देउन सभापती व उपसभापती यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. एकंदरीत साडेतिन वर्षाचा प्रशासकीय राज संपूर आज पासून पेण पंचायत समितीमध्ये लोकराज्याला सुरूवात झाली.
